Laxman Hake Warning To Ajit Pawar : ओबीसी समाजाच्या आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलंय. त्यांनी म्हटले की, अजित पवारांचे दोन आमदार मनोज जरांगेंना रसद पुरवतात. लक्ष्मण हाके यांनी या संदर्भात थेट इशारा दिला की, जर अजित पवारांनी परिस्थिती गंभीरपणे न घेतली, तर ते माजी होऊ शकतात. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) म्हटलंय की, बीड जिल्ह्याचा विकास झाला तर ऊसतोड मजूर कुठून भेटणार? म्हणून शासनकर्ते (Ajit Pawar) बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष करतात. अजून पाच वर्षे जाऊ द्या. पाच वर्षांनी यांना यांची लोक ऊस तोडायला उतरावे लागतील, आमची लोक कुठेही ऊस तोडायला जाणार नाहीत. स्वतःच्या मेहनतीवर पुढे येतील कोणाच्या मेहरबानीवर (OBC Reservation) नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. बीड जिल्ह्यातील स्थलांतरित मजूर इतर जिल्ह्यात जाऊन चांगल्या प्रकारे जीवन जगत आहे. इथून पुढे तो आता क्रांती करेल, असं देखील हाके म्हटले आहेत.
या सरकारने 50 ते 60% लोकांच्या अन्नात माती कालवली आहे. दहा टक्के लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं, हतबल झालं, गडागडा लोळलं आणि ओबीसींचे आरक्षण संपवलं. संघर्ष यात्रेत अख्खी जनता सहभागी होईल. नेते जरी सहभागी झाले नाही, तरी जनता दहा पटीने येईल. आज ओबीसींबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी हाकेंनी केली आहे.
अजित पवारांचे दोन आमदार हे मनोज जरांगेंना रसद पुरवतात. बारामतीत अजित पवारांना आमची मते लागतात. खरंच आम्ही मनावर घेतलं, तर अजित पवार तुम्ही माजी होऊन जाल. तुमच्याकडे किती पैसा आहे? तुम्ही किती हेलिकॉप्टरमधून पैसे उडवणार आहात? तर तुमच्याकडे बघतो. बाबासाहेबांचे संविधान जर आमच्या लोकांना कळलं ना, तर तुमचे कारखाने नाही जर उडून लावले, या लोकांनी तर मला सांगा. अरे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये जर लोक घुसतात, तर तुम किस झाड की पत्ती है? आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं, पण आता नाही. आम्ही जेव्हा आमच्या औकातीवर उतरू. आमच्या सर्व जाती एक झालेल्या असतील,तर हे सर्व माजी झालेले असतील असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलाय.