Ambadas Danve Suspension Reversed : विधानपरिषदेत असंविधानिक भाषा (शिवीगाळ)केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी निलंबन केलं होतं. दरम्यान, दानवे या कारवाईचा फेरविचार करावा, अशी मागणी दानवे (Ambadas Danve ) यांनी पत्राद्वारे उपसभापती गोऱ्हे यांच्याकडे केली होती. (Prasad Las) त्यावर विचार केला असून अखेर उपसभापती डॉ, निलम गोऱ्ये यांनी दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांचा होता तो आता 3 दिवसांचा केला असून उद्यापासून दानवे सभागृहाच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. दानवे यांच्यावर पाच दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
मला हे प्रकरण ताणायचे नाही वसंत मोरे उद्धव ठाकरेंच्या भेटीला; वंचितला बाय-बाय करत लवकरच हातात शिवबंधन बाधंणार?
यावर बोलताना भाजप आमदार प्रसाद लाड म्हणाले, हे प्रकरण मला काही जास्त ताणायचं नाही. या प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दिलगीरी व्यक्त केली आहे. तसंच, दानवे यांनीही पत्र पाठवून उपसभापतींकडे याबद्दल विनंती केली. त्यावर माझ्याशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यामुळे या प्रकणात मला काही जास्त पुढे जायच नाही. सरकार जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असही आमदार लाड यावेळी म्हणाले.
नेमकं काय घडलं? धनुभाऊ तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचय…सकल मराठा समाजाचा कृषीमंत्री मुंडेंना थेट इशारा
लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाषणावर निषेध व्यक्त करण्याचा ठराव विधानपरिषदेत मांडण्यात यावा, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसंच, यावर अंबादास दानवे यांनी भूमिका मांडावी, असं दरेकर म्हणाले. मग अंबादास दानवे बोलायला उभे राहिले. संबंधित विषय हा लोकसभेतला आहे. त्यावर इथं चर्चा होणं अपेक्षित नाही, असं अंबादास दानवे म्हणाले.
हातवारे केल्याने आक्रमक झाले
दरम्यान, अंबादास दानवे बोलत असतानाच सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यानंतर अंबादास दानवे आक्रमक झाले. त्यांचा तोल ढासळला अन् दावने यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यांच्या या वक्तव्याला प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी कारवाई करत दानवेंचं पाच दिवसांसाठी निलंबन केलं होतं.