Vasant More On Swargate ST Case : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली होती तर आता आणखी एक संतापजनक घटना पुण्यात (Pune News) घडली आहे. स्वारगेट बस स्थानकात (Swargate ST Stand) एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर पुन्हा एकदा पुण्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करत शिवसेना नेते (ठाकरे गट) वसंत मोरे (Vasant More) यांनी सुरक्षारक्षाकांच्या केबिनची तोडफोड केली आहे.
एसटीमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच
यानंतर माध्यमांशी बोलताना, वसंत मोरे म्हणाले की, स्वारगेट एसटी स्थानकामध्ये 20 सुरक्षा कर्मचारी आहेत मात्र हे 20 सुरक्षा कर्मचारी असताना देखील सुरक्षा केबिनच्या समोर उभ्या असलेल्या एसटीमध्ये बलात्कार होत असेल तर या सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग काय? त्यामुळे आम्ही ही सुरक्षा केबिन फोडली असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच स्वारगेट एसटी आगाराच्या कडेला बंद असलेल्या एसटीमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच पडलेला आहे. सर्व गोष्टींना येथील प्रशासन व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक जबाबदार आहे. त्यामुळे कठोरातील कठोर कारवाई या सर्वांवर झाली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
#WATCH | Pune, Maharashtra: Shiv Sena (UBT) leader Vasant More along with other party leaders, holds a protest at the Swargate bus stand over the alleged rape of a 26-year-old woman. pic.twitter.com/du9aQCMJyL
— ANI (@ANI) February 26, 2025
पुढे बोलताना वसंत मोरे म्हणाले की, सर्व प्रकरणांमध्ये आता सुरक्षा कर्मचारी आणि संबंधित आगार प्रमुखाववर कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई झाली नाही तर आगामी काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिला. तसेच बस स्थानकावर शेकडो कंडोम्स पडलेत म्हणजे इथे रोज बलात्कार होत असतील, असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.
आरोपी सराईत गुन्हेगार, फोटो व्हायरल
तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो समोर आला आहे.
‘उज्वल निकम यांच्या मुलानेच धनंजय मुंडे यांची केस लढली होती अन्…’, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
सीसीटीव्हीवरून या गुन्ह्यातल्या आरोपीची ओळख पटली असून सध्या तो फरार आहे. काही दिवसांपुर्वी त्याला सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.