Download App

Video: जय शाहला बुध, गुरू अन् शुक्राचा अध्यक्ष करा; गावच्या मुलांचा उल्लेख करत ठाकरेंचं थेट चॅलेंज

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray on Jai Shah Cricket : विधानसभेचा प्रचारा आता कुठे रंगात आलाय. एकमेकांवर वार प्रतिवार सुरू झाले आहेत. शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरु केला आहे. (Amit Shah ) ठाकरे थेट नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ले करत आहेत. आता त्यांनी अमित शाह यांच्या मुलगा जय शाह यांच्यावर हल्ला केला. जय शाह यांना कोणत्या निकषावर बीसीसीआयचे अध्यक्षपद दिले? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधारमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.

जय शाह यांच्यावर हल्ला

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. परंतु, मी अमित शाह यांना विचारतो, जय शाह यांना क्रिकेटमधील काय माहीत आहे? मी आव्हान देतो, जय शहा यांनी गावातील तरुणांची विकेट काढून दाखवावी, मग त्यांना बीसीसीआय नाही तर कुठेही अध्यक्ष करा, माझा विरोध असणार नाही असा टोला त्यांनी लगवला आहे.

मोदी-शहांपासून महाराष्ट्राला धोका, त्यांना महाराष्ट्र.. संजय राऊतांचा घणाघात

जय शाह यांच्यापेक्षा आमच्या गावातील तरुण चांगला क्रिकेट खेळतो. जय शाह यांनी त्या गावातील तरुणाची विकेट काढली तर मग थेट त्यांना बीसीसीआय नाही तर आणखी कुठे अध्यक्षपद द्या. त्यांना क्रिकेट माहीत नाही. त्यांनी विराट कोहलीचा विक्रम मोडला नाही? मग त्यांना अध्यक्ष का केले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आता त्यांच्या या आरोपांवर काय पलटवार होते हे पाहण महत्वाचं आहे.

महिलांना तीन हजार रुपये देणार

आमचे सरकार आल्यावर महिलांना दीड हजार नाही तर तीन हजार रुपये देणार आहे. पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांना सहजपणे आपली तक्रार नोंदवता येईल. आम्ही फक्त मुलींना नाही तर मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहोत. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले होते. आता पुन्हा कर्जमुक्त केले असते. परंतु, त्यांनी आमचे सरकार पाडले. महायुती ठेकेदारांचे पोट भरत आहे. तो विकास आम्हाला नको आहे असंही ठाकरे म्हणाले आहेत.

follow us