Download App

महाविकास आघाडीत फिलगुड! महायुतीला मात्र बंडखोरीचे धक्के, ‘या’ मतदारसंघात डोकेदुखी

Lok Sabha Election : राज्यात महायुतीत काही जागांवरून अजूनही तिढा मिटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत. परंतु, काही जागांचा तिढा सोडविताना या नेत्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच महाविकास आघाडीने मात्र काही जागांचा तिढा सोडविण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार आहेत त्या जागा आम्ही लढवणार आहोत. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागा आमच्याकडेच राहतील पण एक ते दोन जागा बदलण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकतात, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काल माध्यमांना दिली होती. परंतु, महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीला बंडखोरीची भीती जास्त सतावू लागली आहे.

हिंगोली मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून चांगलेच रणकंदन माजले आहे. त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजप नेत्यांकडून प्रचंड विरोध करण्यात आला. त्यामुळे निवडणुकीची वाट अधिक बिकट होऊ नये याचा विचार करत एकनाथ शिंदे उमेदवारी बदलास तयार झाले. हेमंत पाटील यांच्याजागी दुसरा उमेदवार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातही हा उमेदवाल भाजपनेच निवडून आणावा अशी खेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तर दुसरीकडे हेमंत पाटील यांचे तिकीट जर खरच कापले गेले तर बंडखोरी होणारच नाही याची खात्री सध्या तरी देता येत नाही.

Loksabha Election 2024 : साताऱ्याच्या जागेवर नेमकं कोण लढणार? पृथ्वीराजबाबांनी केली भूमिका जाहीर

यवतमाळ वाशिम मतदारसंघात विद्यमान खासदार भावना गवळी यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. अर्ज दाखल करण्यासाठी फक्त तीन दिवस राहिले आहेत तरी देखील उमेदवारीचे कोडे सुटलेले नाही. या मतदारसंघात भावना गवळी यांची उमेदवारी मजबूत मानली जात आहे. त्यांना उमेदवारी जाहीर होत नसल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटू लागला आहे. भाजप श्रेष्ठींनी भावना गवळी यांना उमेदवारी देऊ नये अशा सूचना केल्याची माहिती आहे. त्यांच्याजागी संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गवळी यांचे समर्थक संतप्त झाले असून त्यांनी राजीनामाा देण्याचा इशारा दिला आहे.

बुलढाणा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना तिकीट दिले आहे. परंतु, येथे शिंदे गटाचेच आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केली आहे. त्यानंतर भाजपाचे निवडणूक प्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनीही सोमवारी अर्ज दाखल केला. शिंदे हे शिवसेनेचे तीन टर्म आमदार होते. परंतु त्यांची उमेदवारी कापली गेली.  याला जाधव कारणीभूत असल्याचा राग त्यांच्या मनात आहे. म्हणून ते भाजपात आले आहेत.

Pune Loksabha : तिकीट कापलं तरीही मुळीकांचा मुरली आण्णांना सपोर्ट, म्हणाले..,

दरम्यान, महाविकास आघाडीतही रस्सीखेच सुरू आहे.  परंतु महायुतीच्या तुलनेत त्यांच्याकडे जास्त ताणाताणी दिसत नाही. वंचित आघाडी बाहेर पडली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेते बैठका घेत जागावाटपावर तोडगा काढत आहेत.  सांगली, मुंबई, सातारा यांसारखे काही अपवाद वगळता महाविकास आघाडीत कुठेही बंडखोरी दिसत नाही.

follow us