Lok Sabha Election : महायुतीत अजूनही जागावाटपाचा समाधानकारक फॉर्म्युला (Lok Sabha Election) निघालेला नाही. जागावाटप अंतिम करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस (Amit Shah) महाराष्ट्रात होते तरीही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर आता तिन्ही पक्षांतील नेते दिल्लीत गेले आहेत. या ठिकाणी लवकरच जागावाटपावर तोडगा निघेल असे सांगण्यात येत आहे. यातच आता महायुतीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठा दावा केला आहे. जागावाटपावरून महायुतीत गडबड आणि भांडण सुरू आहेत. भविष्यात फारच भयानक परिस्थिती होणार आहे,असा दावा नाना पटोले यांनी केला.
Lok Sabha Election : ..तर बारामतीत सुनेत्रा पवारच उमेदवार; तटकरेंनी थेट घोषणाच केली
जागावाटपावरून महायुतीत गडबड आहे. महाविकासात आघाडीत मात्र कोणतेही भांडण नाही. महायुतीत तर आता भांडणे सुरू झाली आहेत. भविष्यात फारच भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरू असून आम्ही योग्य वेळी आमचं जागावाटप जाहीर करू. महायुतीत काय व्हायचं ते होईल कारण त्यांना आता सत्तेची मस्ती आली आहे. पेपरफुटीच्या बातम्या येत आहेत पण सरकार त्यावर काहीच करत नाही. यातूव हुशार मुलांचं नुकसान होत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
दरम्यान, भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामागे अद्याप महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम झाली नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने भाजपकडे गतवेळी लढलेल्या सर्व 22 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने 10 जागांची मागणी केली आहे. या मागणीनुसार भाजपने जागा वाटप केल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 16 जागा येतात.
Loksabha elections : शिवानी वडेट्टीवार लोकसभा लढणार? कॉंग्रेसकडे केली तिकीटाची मागणी
या जागावाटपाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. हा फॉर्म्यूला त्यांना मान्य नाही. परंतु, भाजपाकडून दबाव वाढल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काही वेळानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिथून निघून गेले. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली.