Friend Killed Home Guard Woman Beed Crime : बीड (Beed) जिल्हा पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरला आहे. गेवराई येथे कार्यरत असलेल्या होमगार्ड महिला आयोध्या (Friend Killed Home Guard Woman) वरकटे (वय 28) हिचा खून तिच्याच जवळच्या मैत्रिणीने केल्याचे पोलीस (Crime) तपासात उघड झाले आहे.
थंड डोक्याने खुनाचा कट रचला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आयोध्या वरकटे आणि आरोपी वृंदावनी फरताळे या दोघी (Love Triangle) जिवलग मैत्रिणी होत्या. मात्र, दोघींनाही एकाच तरुणावर प्रेम असल्याचे पुढे आले. या प्रेमसंबंधातील ताणतणावामुळे वारंवार वाद घडत होते. अखेर, आयोध्या तिच्या प्रेमाच्या आड येत असल्याचे वृंदावनीला वाटल्याने तिने अत्यंत थंड डोक्याने खुनाचा कट रचला.
अधिक तपासात समोर आले की, वृंदावनीने आयोध्याला घरात बोलावून घेतले आणि तेथेच तिचा गळा आवळून खून केला. मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जवळच्या नाल्यात टाकण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट का घेतली?, स्वत: फडणवीसांनीच सांगितलं ‘हे’ कारण
प्रेमसंबंधातील वादातून हत्या?
शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवत वृंदावनीला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे सूत्रांकडून कळते. या प्रकरणामध्ये दोघींशी संबंधित प्रियकराचा थेट सहभाग होता का? हे तपासले जात आहे.
तरूणांसाठी सुवर्णसंधी! SBI क्लर्क पदांसाठी 26 ऑगस्टपर्यंत अर्ज करा, 5180 पदांसाठी मेगाभरती सुरू
या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन क्षीरसागर यांनी सांगितले की, प्रेमसंबंधातील वादातून घडलेल्या या खुनाचा तपास जलदगतीने सुरू आहे. आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपासात प्रियकराची भूमिका स्पष्ट होईल. बीडमध्ये यापूर्वीही अशा प्रेमसंबंधातून घडलेल्या घटनांनी समाज हादरला होता. पुन्हा एकदा या खुनाने प्रेमातील गुंतागुंती किती भयंकर रूप घेऊ शकतात, हे स्पष्ट केले आहे.