Download App

Mahanand Dairy : राज्य सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील महानंद डेअरी गुजरातच्या ताब्यात

Mahanand Dairy : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महानंद डेअरीवरून (Mahanand Dairy ) राजकारण तापलं आहे . आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

Mahanand Dairy : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महानंद डेअरीवरून (Mahanand Dairy ) राजकारण तापलं आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, गुजरातच्या मदर डेअरीकडे (Mother Dairy) महानंद डेअरीचा ताबा देण्यात आला आहे. 2 मे रोजी हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, महानंद डेअरी तोट्यात असल्याने राज्य सरकारने (State government) नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाशी (National Dairy Development Board) करार करत महाराष्ट्रातील महानंद डेअरीचा ताबा नॅशनल डेअरी डेव्हलपमेंटची उपकंपनी मदर डेअरीकडे दिला.
राज्य सरकारने नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाशी पुढील पाच वर्षासाठी करार केला आहे. तसेच राज्य सरकार महानंद डेअरीच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देखील मदर डेअरीला करणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा या प्रकरणात राजकारण तापण्याची शक्यता आहे.
‘घड्याळ चोरणाऱ्यांचं घड्याळ 10 : 10 वाजता बंद पडणार’; कराळे गुरुजींच्या निशाण्यावर अजितदादा!
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महानंद डेअरीच्या हस्तांतरणावरून राजकारण सुरु होता. मात्र आता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने विरोधक कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
बारामतीत मतदानाचा कमी टक्का, कुणाला देणार धक्का? पुतण्या अन् काकांचंं वाढलं टेन्शन
follow us

वेब स्टोरीज