‘पाच रुपये फरक दिला, निम्मा संघांनी हडप केला’; राधाकृष्ण विखेंचा रोख कुणाकडे ?

‘पाच रुपये फरक दिला, निम्मा संघांनी हडप केला’; राधाकृष्ण विखेंचा रोख कुणाकडे ?

कर्जत : राज्यात दूग्ध व्यवसायात अमूल आणि मदर डेअरीसारख्या कंपन्यांनी प्रवेश केल्याने स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू लागला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक लिटर दुधासाठी फक्त 20 आणि 22 रुपये मिळत होते, ते शेतकऱ्यांना घ्यावे लागत होते. आज मात्र दुधाला 35 ते 40 रुपयांपर्यंत विक्रमी भाव मिळतोय.

‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री असताना दूध भावातील फरक म्हणून पहिल्यांदा शेतकऱ्यांना पाच रुपयांचा फरक जाहीर करण्यात आला. मात्र यातील निम्मा पैसा संघांनी हडप केला. शेतकऱ्यांच्या हातात फार कमी पैसे आले’, अशी खंत पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी व्यक्त केली.

कर्जत येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आ. प्रा. राम शिंदे उपस्थित होते.

वाचा : Ajit Pawar यांनी बैठक घेतली आणि विखेंनी दाखवला इंगा!

विखे पुढे म्हणाले, की ‘राज्यात दुग्धव्यवसायात स्पर्धा वाढली आहे. 1998 मध्ये तेव्हाच्या सरकारने दुग्ध व्यवसायात खासगी क्षेत्राला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर त्यावेळी टीका झाली होती. मात्र त्यामुळे या व्यवसायात स्पर्धा वाढली.’

‘अमूलमुळे दूध संकलन आणि पेमेंटमध्ये शिस्त आली. थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देण्याची पद्धत प्रथम अमूलने सुरू केली. नाही तर आपल्या सहकारी संघाचे पेमेंट दूध सोसायट्यांकडे सोसायट्यांचे पेमेंट पतसंस्थेकडे आणि राहिलेले पेमेंट सभासद भेटला तर ठीक नाहीतर संचालक मंडळाकडे अशी परिस्थिती होती. आता ही परिस्थिती बदलली आहे.’

Shivaji Kardile : ही तर विखेंचीच किमया

‘अमूल, मदर डेअरीमुळे स्पर्धा निर्माण झाली. स्पर्धा राहिली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात 20 आणि 22 रुपये लिटर दूधाचे दर शेतकऱ्यांना घ्यावे लागले. आज 35 ते 40 रुपयांप्रयंत दर गेले ही वस्तूस्थिती आहे.’

‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा पाच रुपये फरक शेतकऱ्यांना दिला. त्यातील निम्मा संघांनी हडप केला. शेतकऱ्यांना फार कमी पैसे मिळाले. आज राज्य सरकारच्या काळात दुधाला विक्रमी भाव मिळत आहे,’ असे विखे म्हणाले.

राम शिंदेंना टोला मारत रोहित पवारांनी केले फडणवीसांचे स्वागत; कर्जतमध्ये रंगली ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा

प्रामाणिकपणे व्यवसाय करा

भेसळ करून आपणच आपल्या मुलाबाळांना विष पाजतोय. प्रामाणिकपणे कोणताही व्यवसाय करा. दूध व्यवसाय आज सर्वात यशस्वी असा उद्योग आहे. कोणताही व्यवसाय करा पण तो प्रामाणिकपणे करा असेही त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube