राम शिंदेंना टोला मारत रोहित पवारांनी केले फडणवीसांचे स्वागत; कर्जतमध्ये रंगली ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा

राम शिंदेंना टोला मारत रोहित पवारांनी केले फडणवीसांचे स्वागत; कर्जतमध्ये रंगली ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा

Rohit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis visits karjat-jamkhed) आज कर्जत दौऱ्यावर येणार आहेत. विविध विकासकामांचा शुभारंभ, शेतकरी मेळावा, अन्य पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा त्यांच्या उपस्थितीत भाजप (BJP) प्रवेश असा कार्यक्रम राहणार आहे. फडणवीस यांच्या या दौऱ्याची कर्जतमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. जागोजागी स्वागताचे फलक लागले आहेत. विकासकामांची माहिती देणारेही फलक आहेत. मात्र, या सगळ्यात एक फलक जो लक्ष वेधून घेत असून या फलकाचीच चर्चा ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. हा फलक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लावला आहे. या फलकावरील मजकूर लक्ष वेधणारा आहे.

वाचा :आव्हाडांनी टाळले पण, रोहित पवार बोललेच; नागालँडमधील भाजप मैत्रीवरून केले सूचक वक्तव्य

या फलकाचीच चर्चा येथे सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघात हार्दिक स्वागत..

महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या आणि बांधून पूर्ण झालेल्या पोलीस निवासस्थानांचे उद्घाटन आपण केल्यामुळे पोलिसांची प्रत्यक्ष राहण्याची सोय होणार आहे. याबद्दल आपले आभार.

Ram Shinde : रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील पाठलाग संपेना..

मविआ सरकारने खर्डा व मिरजगाव हे दोन नवीन पोलीस ठाणे मंजूर केले आहे. तेथे आवश्यक मनुष्यबळही दिल्याने कामकाज सुरू झाले आहे. या पोलीस ठाण्यासाठी इमारत व पोलीस निवासस्थानांसाठी माझा पाठपुरावा सुरू असून तो अंतिम पातळीवर आहे. त्यालाही आपण मंजुरी द्यावी, ही विनंती.

कुसडगावच्या एसआरपीएफ सेंटरचे काम जवळपास 50 टक्के पूर्ण झाले असून काहीजण ते चुकीच्या हेतूने इतरत्र हलविण्याचा प्रयत्न करत आहेत. येथील लोकच ते होऊ देणार नाहीत आणि आपणही सरकारचा पैसा वाया जाऊ देणार नाही, असा विश्वास आहे.

अजितदादांना धक्का दिल्यानंतर फडणवीस हे रोहित पवारांच्या विरोधात बार उडविणार

मतदारसंघातील रस्ते व अध्यात्मिक धार्मिक विकासकामांना या सरकारने दिलेली स्थगितीही आपण उठवाल, ही अपेक्षा. आजवर लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे 15 ते 20 वर्षांपासून निर्माण झालेला कर्जत-जामखेडच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा एक कार्यकर्ता आहे. जनतेकडे पाहून त्यास सहकार्य कराल ही अपेक्षा

आपल्याकडे सहकार्याच्या भावनेतून पाहणारे आम्ही समस्त कर्जत-जामखेडकर – रोहित पवार, आमदार असा मजकूर या फलकावर लिहिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube