Ajit Pawar यांनी बैठक घेतली आणि विखेंनी दाखवला इंगा!

Ajit Pawar यांनी बैठक घेतली आणि विखेंनी दाखवला इंगा!

नगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेतील सर्व संचालकांना विश्वासात न घेता सहकारमध्ये राजकीय रंग देण्याचा विराेधकांचा डाव हाणून पाडण्यासाठी नाईलाजाने निवडणूक लढवावी लागली. विराेधी पक्षनेत्यांनी भाजप (BJP) संचालकांना डावलून बैठक घेतल्याने विराेधकांना जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने संचालकांनी आरसा दाखवला आहे, असा टाेला खासदार डाॅ. सुजय विखे-पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी लगावला. तर दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल अहमदनगर जिल्ह्याचा दाैरा केला. त्यावेळी त्यांनी बैठक घेतली पण त्यात बाेलावलेच नसल्याने विखे-पाटील यांनी इंगा दाखवल्याचे बोलले जात आहे.

Mangaldas Bandal : मी बंड करणारच… लोकं माझं मूल्यमापन करतील!

जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले विजयी झाले. त्यांचा सत्कार खासदार डाॅ. सुजय विखे-पाटील यांनी केला. यावेळी आमदार माेनिका राजळे आदी उपस्थित हाेते. त्यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते.

डाॅ. विखे पाटील म्हणाले, ”विराेधकांना या निवडणुकीमुळे भाजपमध्ये कुठलीही विसंगती नसल्याचा नक्कीच बाेध झाला असेल. भाजपच्या संचालकांना विश्वासात घेतले असते, तर कदाचित ही निवडणूक झाली नसती. परंतु, यापुढे सर्वांना विश्वासात घेऊनच बँकेचा कारभार केला जाईल.

तर महाविकास आघाडीकडे आम्हाला एक वर्षांसाठी अध्यक्षपदाची संधी द्या, अशी विनंती विखे-पाटील यांनी केली होती. मात्र. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा फाॅर्म भरला. त्यातच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हीसीद्वारे जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात घ्या, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या, असे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज