Download App

धाकधूक वाढली! थोड्याच वेळात दहावीचा निकाल, ‘येथे’ करा चेक

Maharashtra 10th Result 2025 SSC Result : आज अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा (Maharashtra 10th Result)संपणार आहे. कारण थोड्याच वेळात दहावीच्या परिक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी अन् पालकांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय. एसएससी बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (10th Result) अध्यक्ष शरद गोसावी हे आज सकाळी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर करणार आहेत. यंदा 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तर दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पालकांना आणि मुलांना आज निकाल पाहता येणार आहे.

मोठी बातमी, 17 मे पासून पुन्हा सुरु होणार IPL, नवीन वेळापत्रक जाहीर

नागपूर विभागामध्ये 679 केंद्रावरून 1 लाख 51 हजार 379 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. तर सर्वाधिक विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातील होते. तेथून 58 हजार 495 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 12 वीचा निकाल लागल्यानंतर आता राज्यभरातील इयत्ता 10 विच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागलेली आहे. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं, आता दहावीच्या निकालात कोण आघाडीवर राहते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.

छत्री घेऊनच घराबाहेर पडा! ‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी

विद्यार्थ्यांनी निकाल कुठे पाहावा?

1. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

2. https://results.digilocker.gov.in

3. https://sscresult.mahahsscboard.in

4. http://sscresult.mkcl.org

वर उल्लेख केलेल्या संकेतस्थळांवर क्लिक करून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. तसेच गुणपत्रिका देखील डाऊनलोड करता येणार आहे. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल आणि इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे.

 

follow us

संबंधित बातम्या