कोकण पुन्हा अव्वल तर, छ.संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी; वाचा दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९,५०६ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

  • Written By: Published:
Ssc Board

Maharashtra SSC10th Result 2026 : 12वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण निकालाचा सर्वात अव्वल लागला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी ८८.४१ टक्के लागला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर विभागनिहाय आकडेवारी 

कोकण: ९७.६२ टक्के

पुणे: ९४.२४ टक्के

नागपूर: ८९.०७ टक्के

मुंबई: ९४.९७ टक्के

कोल्हापूर: ९५.४७ टक्के

अमरावती: ९०.५० टक्के

नाशिक: ९०.५३ टक्के

लातूर: ८८.४२ टक्के

छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: १५ लाख ५५ हजार ०२६

उत्तीर्ण विद्यार्थी: १४ लाख २० हजार ४८६

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, होती. त्यापैकी १५,४२,४७२ विदयार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,२०,४८६ विद्यार्थी लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामधून एकूण १५,५५,०२६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची

एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.०९ आहे.

२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९,५०६ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८,८२५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी २२,००३ विद्यार्थी उत्तीर्ण आले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.३३ आहे.

३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २९,५१८ पुनर्परिक्षार्थी विद्याथ्यर्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी २८,८६७ विदयार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी ९७५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३३.७९ आहे.

४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, खाजगी व पुनर्परिक्षार्थी मिळून एकूण १६,१४,०५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी १६,००,१६४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी १४,५२,२४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.७५ आहे.

५. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण १०,०३१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,९१२ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यांपैकी ९,०४२ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२२ आहे.

६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.६२%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा (८८.४१ %) आहे.

७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.९६ असून मुलांच्या उत्तीर्णतची टक्केवारी ८९.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.४० ने जास्त आहे.

८. माध्यमिक शालान्त (इ.१० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ करीता एकूण ६४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी एकूण २० विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.

follow us