SSC Result 2023: दहावीचा निकाल जाहीर! कोकणनं पुन्हा मारली बाजी; नागपूर विभाग पिछाडीवर

SSC Result 2023: दहावीचा निकाल जाहीर! कोकणनं पुन्हा मारली बाजी; नागपूर विभाग पिछाडीवर

Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल (SCC Result) जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

निकालामध्ये 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेऊन १० वीचा निकाल आणि विभागवार टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे.

दहावीच्या निकालामध्ये यंदा कोकण विभागाने चांगलीच बाजी मारली आहे. तर कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, लातूर, नाशिक आणि नागपूर या विभागाने देखील चांगलीच कामगिरी केली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी 92.05 टक्के निकाल नागपूर विभागाचा लागला, बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.

कोकण-98.11 टक्के, कोल्हापूर- 96.73 टक्के, पुणे- 95.64 टक्के, मुंबई- 93.66 टक्के, औरंगाबाद- 93.23 टक्के, अमरावती- 93.22 टक्के, लातूर- 92.67 टक्के, नाशिक- 92.22 टक्के, नागपूर- 92.05 टक्के, बारावीपाठोपाठ दहावीच्या निकालही मुलींनीच बाजी मारली आहे. यंदा दहावीत 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 92.05 टक्के निकाल लागला आहे.

छत्रपती उदयनराजेंना शिंदे सरकारकडून मोठी जबाबदारी; प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली. विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे.

परंतु गेल्या 5 वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याचं निदर्शनास आलं आहे.गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विद्यार्थ्यांची नोंदणी तब्बल 61 हजार 708 नं कमी झाली आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. यंदा तुम्ही अगदी काही सेकंदात निकाल पाहू शकणार आहात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube