VIDEO : दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द होणार? बोर्डाच्या अध्यक्षांनी स्पष्ट सांगितले…

Sharad Gosavi On 10th Result SSC Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल (10th Result) जाहीर केला. यंदा 94.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षाच्या 95.81 टक्के निकालाच्या तुलनेत यंदा 1.71 टक्क्यांनी कमी लागला आहे. कोकण विभागाने 98.82 टक्के निकालासह प्रथम क्रमांक (SSC Result) पटकावला, तर नागपूर विभाग 90.78 टक्क्यांसह शेवटच्या स्थानावर राहिला. यंदाही मुली मुलांपेक्षा अव्वल आहेत. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी विशेष संवाद साधला.
SSC Result : दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 94.10 टक्के; कोकणाने मारली बाजी
यावेळी बोलताना शरद गोसावी यांनी म्हटलंय की, यावर्षी तुलनेने दहावीचा निकाल लवकर जाहीर करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या परीक्षा लवकर घेतल्यामुळे पुढील गोष्टींसाठी वेळ मिळेल. यावर्षी निकाल 94.10 टक्के लागला आहे, तुलनेत निकाल यंदा 1.71 टक्क्यांनी कमी लागला असता तरी निकाल तुलनेने चांगला लागलेला आहे.
विद्यार्थ्यांना योग्य सल्ला घेऊन पुढे जाणे अपेक्षित आहे. मुलींनी बाजी मारली असून कोकण विभाग अव्वल असल्याचं शरद गोसावी यांनी म्हटलंय. राज्यभरात एकसारखा निकालाचा ट्रेंड असल्याचं त्यांनी म्हटलंय.
आपण असा निर्णय घेतला की, यावर्षी ज्या केंद्रावर कॉपीसारखे गैरप्रकार होतील, त्यांची चौकशी करून ते केंद्र पुढील वर्षापासून बंद करण्यात येतील. 2026-27 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. अगोदरचा हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. आतापर्यंत 37 केंद्रावर हा गैरप्रकार घडलेला आहे. त्यांची चौकशी करून ती केंद्र बंद करणार आहे. साधारण 2018 ते 2024 मध्ये ज्या केंद्रांवर गैरप्रकार झाले होते, तेथील संपूर्ण मनुष्यबळ बदलण्यात आलं होतं, असं देखील शरद गोसावी यांनी म्हटलंय.
कोल्हापूर विभागाने कमबॅक केलंय. सहापैकी दोन विषयांत विद्यार्थी अनुत्तीर्ण असल्यास त्याला अकरावीला प्रवेश घेता येतो.
10th Results LIVE :राज्यात 285 विद्यार्थ्यांना 35 टक्के गुण; काय आहेत पुनर्तपासणीच्या तारखा?
दहावीचं बोर्ड होणार, अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना शरद गोसावी यांनी म्हटलंय की, यामध्ये अजिबात तथ्य नाही. दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणारच आहे. या परीक्षा कधीही बंद होणार नाही, हे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घ्यावं, असं शरद गोसावी यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता, सर्व विद्यार्थ्यांनी पुढील तयारीला लागावं. एनसीआरटी अभ्यासक्रमाची व्यापकता मोठी असते. याप्रमाणे राज्यशासनाने धोरण आखलं आहे. त्याचा अभ्यासक्रम आपण घेणार आहोत. तसेच मूल्यमापन होणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.