SSC & HSC Board Exam : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर पहिल्यांदाच जातीचा प्रवर्ग; शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण
SSC & HSC Board Exam 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या हॉल तिकिटावर (Maharashtra SSC Hall Ticket) विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. हॉल तिकिटावर केल्या गेलेल्या जात प्रवर्गाच्या उल्लेखामुळे शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली होती. याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी स्पष्टीकरण दिले.
वाल्मिक कराडचं सोलापुरातही घबाड, दुसऱ्या पत्नीच्या नावावर 35 एकर जमीन, सातबारा आला समोर…
मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, बारावीच्या हॅाल तिकिटावर विद्यार्थ्यांच्या जातीचा नाही तर त्यांच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजे, ओबीसी, एसटी, एससी असा उल्लेख आहे. महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. तसेच विद्यार्थ्यांना १० वी आणि १२ वी नंतर पुढील शिक्षणासाठी अनेक कागद पत्र काढावी लागतात. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कागदपत्रे काढताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, यासाठी हॉल तिकिटावर प्रवर्गाचा उल्लेख केला आहे. विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख फक्त दाखवल्यावर असतो. त्यात चुक झाली तर पुढील शिक्षणात अडचण येऊ शकते. ते टाळण्यासाठी हॅाल तिकिटावर प्रवर्गाचा उल्लेख मंडळाने केला आहे.
Champions Trophy 2025 भारतीय संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी
सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षण मंडळाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. दहावी-बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख करणे चुकीचे आहे. कारण हॉल तिकीट हे तात्पुरते असते. मग यावर जातीचा किंवा प्रवर्गाचा उल्लेख करण्याची गरज काय? आहे, असा प्रखड सवाल त्यांनी शिक्षण मंडळाला केला आहे. शाळेच्या दाखल्यावर जातीचा उल्लेख असतो, त्यामुळे हॉल तिकिटावर उल्लेख करण्याचे कारण काय? असेही हेरंब कुलकर्णी म्हणाले.
दरम्यान, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि १२ वीच्या परीक्षांसाठी १२वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिट देण्यात येत आहेत. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून (२० जानेवारी) हॉल तिकिट देण्यात येणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना हॉल तिकिट ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळाववरुन डाउनलोड करता येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च २०२५ मध्ये होणार आहेत.