Download App

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात चहा, रिक्षा अन् खोक्यांनी पिकवला हशा, अजितदादा म्हणतात, अयोध्येत..

Ajit Pawar : पहिल्यांदा ज्यांनी चहा विकला ते कुठपर्यंत गेले. सगळ्यात पहिल्यांदा रिक्षा चालवणारे आज अयोध्येत पोहोचले, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात मात्र चांगलाच हशा पिकला.

निमित्त होते ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या ‘धडपड’ या पुस्तक प्रकाशनाचे. या पुस्तकाचे प्रकाशन अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी भाषणात पवार यांनी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांकडे लक्ष वेधले.

ते म्हणाले, ‘सध्याच्या काळात पत्रकारांवरील हल्ले वाढले आहेत. हे आजिबात बरोबर नाही. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ले थांबले पाहिजेत.’ ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यावर झालेला हल्ला तसेच छत्रपती संभाजीनगर येथील एका गायकाला खोक्यावर गाणे म्हटले म्हणून तुरुंगात डांबले या घटनांचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

आता सरकारी कार्यालये सकाळी 7:30 वाजता उघडणार, मुख्यमंत्र्यांची माहिती

भाषणा दरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. ‘सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी रिक्षा चालवली, सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी चहा विकला ते आज कुठे जाऊन पोहोचले आहेत. तर पहिल्यांदा रिक्षा चालवणारे अयोध्येला पोहोचले आहेत. तसे तात्या तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा रिक्षा चालवणारे आहात, किती जणांना वाट दाखवलीत’, असे पवार म्हणाले.

खोके म्हटलं की कोण ?

‘राज्यात अघोषित आणीबाणी सुरू आहे की काय असे आता वाटत आहे. एका गायकाने खोक्यांवर गाणे तयार केले म्हणून त्याला तुरुंगात डांबले जाते. आता या महाभागांनी या खोकेबहाद्दरांनी स्वतःच एक प्रकारे कबुली दिली आहे. आता मला सांगा आज खोके म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर कोण येते ?  हे मी सांगण्याची गरज नाही.’ अशा शब्दांत सरकारकडून सुरू असलेल्या या कारवायांचा त्यांनी निषेध केला.

सावधान! OTP चा सापळा… घोटाळेबाज या नवीन मार्गांने लोकांना लुबाडत आहेत

पत्रकारितेवर हल्ले सुरू आहेत हे घातक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेला आजिबात शोभणारे नाही. त्या गायकाला थेट तुरुंगात डांबले जाते. खरे पाहिले तर त्याने कुणाचे नाव सुद्धा घेतले नव्हते. तो फक्त खोक्यावर गाणे गात होता. आता या महाभागांनी खोकेबहाद्दरांनी स्वतःच एक प्रकारे कबुली दिली आहे.

Tags

follow us