Anjali Damania : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Retirement) यांनी त्यांच्या ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कार्यकर्ते जसे स्तब्ध झाले आहेत तसेच पक्षातील नेतेही स्तब्ध झाले आहेत.
पवारांच्या या निर्णयाचा त्यांच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते विरोध करत असताना निर्णय मागे घेण्याची विनंती करत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र या निर्णयााला पाठिंबा दिला. रडणाऱ्या कार्यकर्त्यांनाही खडसावलं.
Ajit Pawar looking really desperate.
Wants to ensure that Sharad Pawar's resignation is accepted
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 2, 2023
अजितदादांच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी ट्विट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की अजित पवार खूप उतावीळ दिसत आहेत. शरद पवारांचा राजीनामा स्वीकारला जाईल याची ते खात्री करून घेत आहेत.
अजित पवार काय म्हणाले ?
काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. उद्या नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब राजकारणातील त्याला बारकावे सांगतील. साहेबांच्या नजरेसमोर नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे, असा सवाल विचारत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना अश्रू ढाळण्याचे कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. रडारड करण्याचे कारण नाही. साहेबांनी निर्णय घेतला आहे. त्यांच्या मनात आहेत त्याच गोष्टी होतील.
Ashok Chavan : पवारांनी निवृत्तीची घोषणा करणं हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय