मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) आजपासून सुरू होत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक काळ महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीति या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून 9 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातील सत्तांतरानंतर आलेले शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये जाेरदार खडाजंगी पाहायला मिळाली.
राज्य विधिमंडळाचे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंचत चालणार आहे. 8 मार्च रोजी अर्थिक पाहणी अहवाल सादर होईल. बजेटवर तीन दिवस तर अर्थसंकल्पीय मागण्यांवर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. या अधिवेशनात एकूण 13 विधेयके मांडली जाणार असून विधान परिषदेत प्रलंबित असलेली तीन विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ पटकथा लेखक जयंत धर्माधिकारी काळाच्या पडद्याआड
नव्याने 7 विधेयके सादर केली जाणार आहेत. विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांचे बहुमत नाही, त्यामुळे 3 विधेयके वरच्या सभागृहात रखडली आहेत. दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस हे अहिभाषण करणार आहेत. दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केल्याने हे अधिवेशन वादळी ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा कोरलं विश्वचषकावर नाव
हे मुद्दे गाजणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या प्रयत्नात असतील. विरोधकांकडून सत्तासंघर्ष, शेतकऱ्यांचा मुद्दा, पोटनिवडणूक प्रचारातील गैरप्रकार यासह अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. या अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार आहे.