Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहावी यादी जाहीर केली असून, आज ३२ उमेदवारांची घोषणा केली आहे. आज मुंबई आणि ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील (MNS) उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातून जुईली शेंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून कल्याण पश्चिममधून उल्हास भोईर आणि उल्हासनगरमधून भगवान भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Video…तर यापुढे तिथंच गाडून टाकणार; धांदरफळ प्रकरणावर सुजय विखे पाटील इतकं कुणावर भडकले?
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्ताने सर्वच पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना मनसेनेही सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत मनसेने ११० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. टप्प्याटप्प्याने उमेदवार जाहीर केले जात असून २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
नंदुरबार वासुदेव गांगुर्डे
मुक्ताईनगर अनिल गंगतिरे
आर्वी विजय वाघमारे
सावनेर घनश्याम निखाडे
नागपूर पूर्व अजय मारोडे
कामठी गणेश मुदलियार
अर्जुनी- मोरगाव भावेश कुंभारे
अहेरी संदीप कोरेत
राळेगाव अशोक मेश्राम
भोकर साईप्रसाद जटालवार
नांदेड उत्तर सदाशिव आरसुळे
परभणी श्रीनिवास लाहोटी
कल्याण पश्चिम उल्हास भोईर
उल्हास नगर भगवान भालेराव
आंबेगाव सुनील इंदोरे
संगमनेर योगेश सूर्यवंशी
राहुरी ज्ञानेश्वर गाडे (माऊली)
नगर शहर सचिन डफळ
माजलगाव श्रीराम बादाडे
दापोली संतोष अबगुल
इचलकरंजी रवी गोंदकर
भंडारा अश्विनी लांडगे
अरमोरी रामकृष्ण मडावी
कन्नड लखन चव्हाण
अकोला पश्चिम प्रशंसा मनोज अंबेरे
सिंदखेडा रामकृष्ण पाटील
अकोट कॅप्टन सुनील डोबाळे
विलेपार्ले जुईली शेंडे
नाशिक पूर्व प्रसाद दत्तात्रय सानप
देवळाली मोहिनी गोकुळ जाधव
नाशिक मध्य अंकुश अरुण पवार
जळगाव ग्रामीण मुकुंदा आनंदा रोटे