Video…तर यापुढे तिथंच गाडून टाकणार; धांदरफळ प्रकरणावर सुजय विखे पाटील इतकं कुणावर भडकले?
Sujay Vikhe on Dhandarfal Case : संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे घडलेल्या घटनेचा मी निषेध व्यक्त करतो. परंतु, आमच्या सभेतील महिलांच्या अंगाव यांचे कार्यकर्ते आले. काही ठिकाणी महिलांचा विनयभंग झाला. (Sujay Vikhe ) महिला ऊसात लपून बसल्या म्हणून वाचल्या. परंतु, आमच्या सभेतील महिलांप्रती जे असं वागले त्याबद्दल कोण माफी मागणार ? असा प्रतिप्रश्न माजी खासदार सुजय विखे यांनी नाव न घेता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात अन् जयश्री थोरात यांना केला आहे.
सुजय विखे यांनी अंभोरा येथे सभेत बोलत असताना बाळासाहेब थोरात, जयश्री थोरात आणि इतर काही कार्यकर्त्यांचे व्हिडिओ या कार्यक्रमात दाखवले. तसंच, या व्हिडिओनंतर विखे हे मोठ्या संतापाने बोलत असल्याचं दिसलं. मी आजपासून आचारसंहितेचं उल्लंघन करतो. यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल काही बोललात तर तिथंच गाडून टाकणार असा थेट इशाराच विखे पाटील यांनी यावेळी दिला आहे.
काय होत प्रकरण?
भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या युवा संकल्प मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्येबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं.या सभेत वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं.सुजय विखे यांनी वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाई करावी असं सुजय विखे म्हणाले.वाहनांची जाळपोळ, तोडफोड करणाऱ्यांवरही कारवाई करावी अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे.