प्रशांत जगतापांच्या उमेदवारीला मविआकडून स्पीडब्रेकर; मतदारसंघाबाहेरच्या उमेदवाराचा मुद्दा गाजणार ?
Hadapsar Assembly constituency: विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जवळजवळ निश्चित झाले आहेत. तरही काही ठिकाणी आघाड्यांमधून उमेदवारांना विरोध होत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात (Hadapsar Assembly constituency) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना उमेदवारी मिळाली आहेत. तर अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार चेतन तुपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतदारसंघात जगताप व तुपे अशी फाइट निश्चित असताना आता महाविकास आघाडीकडून प्रशांत जगताप यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध सुरू केलाय.
शिवसेनेने वाढवली चंद्रकांतदादांची डोकेदुखी; कोथरुडमधील मतांची फाटाफूट पडणार भारी
प्रशांत जगताप हे मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार असून, त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडे करण्यात आली आहे. उमेदवारी रद्द न केल्यास हडपसर विकास आघाडीकडून उमेदवारी देऊन निवडणूक लढविली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. हडपसर मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात हडपसर विकास आघाडीच्या वतीने महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब शिवरकर, शिवसेना उबाठा गटाचे माजी आमदार महादेव बाबर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट या सर्वांनी या भागाचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. यावेळी चौदा माजी नगरसेवकही उपस्थित होते.
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांनी शोधला भिडू; अभिनेत्री स्वरा भास्करच्या पतीला दिलं तिकीट
महाविकास आघाडीचा उमेदवार बदलण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे. हडपसरच्या बाहेरचा उमेदवार नको हे महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना याबाबत कळविले होते. तरीही मतदारसंघाच्या बाहेरील उमेदवार दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. अमोल कोल्हे यांची सामूहिकरित्या भेटून तसेच या उमेदवारीबाबत योग्य ते निर्णय घेण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे दिलीप तुपे, महादेव बाबर, माजी नगरसेवक विजय देशमुख, तानाजी लोणकर, राजूभाऊ बाबर, भरत चौधरी, तानाजी लोणकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक योगेश ससाणे, माजी उपमहापौर निलेश मगर, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, प्रवीण तुपे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे आनंद अळकुटी, शिवसेनेचे नगरसेविका प्राचीताई आल्हाट, संगिताताई ठोसर, शरद पवार गटाचे शहर उपाध्यक्ष समीर तुपे अशा सर्वांच्या वतीने मुंबईत भेट घेऊन उमेदवारी बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मान्य न झाल्यास 2002 च्या महापालिका निवडणुकीप्रमाणे हडपसर विकास आघाडीचा प्रयोग केला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.