महायुतीत मिठाचा खडा! हडपसरमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराविरुद्ध भाजपचे आंदोलन
Pune News : राज्यात विधानसभा निवडणुका अगदी जवळ (Maharashtra Elections) आल्या आहेत. अशात आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत असे दाखवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि महायुतीकडून होत आहे. निदान नेते मंडळी तरी तसं भासवत आहेत. पण, कार्यकर्ते काही ऐकायला तयार नाहीत. त्यांचा राग कधीतरी अनावर होतो त्यावेळी मग काळे झेंडे दाखवणे किंवा फलकांवरील आमदारांच्या नावाला काळे फासण्याचे प्रकार घडतात. असाच प्रकार पुण्यात महायुतीत दुसऱ्यांदा घडला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.
नेमकं चाललंय तरी काय? पुण्यात भाजपानेच अजितदादांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे
भारतीय जनता जनता पार्टीच्या आमदारांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादीकडून लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आमदार चेतन तुपे यांच्या कार्यपद्धतीवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तसेच मांजरी येथील उड्डाणपुलाच्या नामफलकाला काळे फासून आंदोलन केले. महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडून पाळला जात नाही याचा निषेध करण्यात आला. महायुतीचा धर्म फक्त एकट्या भाजनेच पाळायचा का असा सवाल भाजप नेते शिवराज घुले यांनी उपस्थित केला. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. आता राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजितदादांनाही काळे झेंडे
दरम्यान, याआधी पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेत मात्र भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवले होते. येथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या वाहनांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले होते.
शिंदेंना हव्यात 120 जागा, अजित पवार ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार, भाजप काय निर्णय घेणार?