Download App

Mahavikas Aaghadi : मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटेना; ‘येथील’ 12 जागांवर मतभेद टोकाला

पुणे जिल्हात महाविकास आघाडीच्या वतीनं आतापर्यंत 21 पैकी 12 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, शरद पवार गटाकडून 10 उमेदवारांच्या

  • Written By: Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा (Mahavikas Aaghadi) तिढा काही आणखीही सुटलेला दिसत नाही. कधी जागावाटप फायनल झाल्याचं सांगितलं जातं, तर कधी काही जागांवरून रुसवे फुगवे असल्याच्या चर्चा रंगतात. अशातच आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याचं समजतंय. तर पुण्यात ठाकरे गटात शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर नाराजी पुढे आली आहे.

वांद्रे पूर्वच्या जागेवरुन नवा वाद?

वांद्रे पूर्वच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशातच आता या जागेवरुनही महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, ठाकरेंनी वरुण सरदेसाई यांना जाहीर केलेल्या वांद्रे पूर्वच्या जागेसाठी काँग्रेस नेते सचिन सावंत इच्छुक होते. त्यांना अंधेरीतून उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर तेथील उमेदवार बदलला आहे.

माहीम मतदारसंघाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; सदा सरवणकरांची अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर

पुणे जिल्हात महाविकास आघाडीच्या वतीनं आतापर्यंत 21 पैकी 12 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, शरद पवार गटाकडून 10 उमेदवारांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, बारामतीत पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यासोबतच, पिंपरी, वडगाव शेरी, खडकवासला,पर्वती,हडपसरमध्येही शरद पवार गटाचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आता उरलेल्या 8 जागा तरी ठाकरे गटाला मिळणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अर्ज भरण्याच्या मुदतीसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तरीसुद्धा महाविकास आघाडीचं अजून बिनसलेलंच आहे. निवडणुका तोंडावर असूनही महाविकास आघाडीत अजून काही जागांवरून घोळ सुरू आहे. त्यामुळे, प्रचार कधी सुरू करायचा आणि नेमका कुणाचा करायचा? असा प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांपुढे उभा ठाकल्याचं दिसतंय.

महाविकास आघाडीत कोणत्या जागांवरुन तिढा?

रामटेक : ठाकरेंच्या शिवसेनेकडून विशाल बरबटे यांना उमेदवारी, काँग्रेसकडून राजेंद्र मुळक इच्छुक
वणी : ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय देरकरांना उमेदवारी, काँग्रेसचे संजय खाडे इच्छुक
यवतमाळ : काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांना उमेदवारी, ठाकरेंची शिवसेनाही इच्छुक
वर्सोवा : ठाकरेंकडून हरुन खान यांना उमेदवारी, काँग्रेसकडून संजय पांडे इच्छुक
वांद्रे पूर्व : काँग्रेसचे सचिन सावंत इच्छुक, ठाकरेंकडून वरूण सरदेसाईंना उमेदवारी
वडाळा : पूर्वापार काँग्रेसची जागा, ठाकरेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा जाधव यांना एबी फॉर्म
भायखळा : ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनोज जामसुतकर यांना एबी फॉर्म, काँग्रेस अजुनही इच्छुक
मिरज : काँग्रेसचे मोहन वानखेडे इच्छुक, ठाकरेंच्या शिवसेनेचाही दावा

follow us