माहीम मतदारसंघाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; सदा सरवणकरांची अर्ज भरण्याची तारीख लांबणीवर
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : मुंबईत माहीम विधानसभेत तिहेरी लढत होणार असल्याचं समोर आलं होतं. माहीममध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Amit Thackeray) तर, शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे येथे मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमित ठाकरेंसाठी महायुती आणि मनसे यांच्याकडून लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. विद्यमान आमदार सदा सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जातय.
लढणार की, हटणार?
माहीममधून अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात लढत होणार आहे. पण, असं झाल्यास खरा फायदा ठाकरे गटाच्या उमेदवाराला होऊ शकतो, असं बोललं जात आहे. त्यामुळे अमित ठाकरेंचं विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातलं आव्हान कमी करण्यासाठी महायुती आणि मनसेकडून प्रयत्न सुरू आहेत. दोन मंत्री दीपक केसरकर एक खास निरोप घेऊन राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेल्याची माहिती समोर आली. तर, दुसरीकडे आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंना महायुतीनं समर्थन दिलं पाहिजे, असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे सरवणकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं बोललं जात आहे.
तुमच्यासारख्या बिबट्यांचा बंदोबस्त हाच टायगर करणार, सुजय विखेंचा थोरातांना इशारा
सदा सरवणकर निवडणूक लढवण्यासाठी ठाम असल्याचं बोललं जात आहे. अशातच माहीम विधानसभेचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सदा सरवणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आज 28 ऑक्टोबर रोजी माहीम विधानसभेसाठी सदा सरवणकर उमेदावरी अर्ज दाखल करणार होते. मात्र, आता त्यांची अर्ज दाखल करण्याची तारीख पुढे ढकलल्याची माहितीही समोर आली आहे.
सदा सरवणकर, समाधान सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. माहीम मतदारसंघातून मनसे उमेदवार अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा दिला आहे. मात्र, सदा सरवणकर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर आता माहीममधून तीन टर्म आमदार असलेले सदा सरवणकर अमित ठाकरेंसाठी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.