संपर्क, संवाद अन् समाधान या त्रिसुत्रीचा अवलंब करा, संभाजीराव पाटील निलंगेकरांचे बुथप्रमुखांना आवाहन
निलंगा : निवडणुकीतील (Vidhansabha Election) विजयासाठी संपर्क, संवाद, समाधान ही त्रिसुत्री महत्त्वाची असून बुथप्रमुखांनी या त्रिसुत्रीचा वापर करत भाजप महायुतीच्या सरकारने केलेला विकास मतदारांना सांगावा, असे आवाहन माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांनी केले.
आमचा कारभार जनतेतून, मी काय पहाटे उठून…; हर्षवर्धन पाटलांची अजितदादांवर खोचक टीका
निलंगा विधानसभा मतदारसंघातील मदनसुरी, हलगरा व औराद शहाजानी जि.प. गट तसेच निलंगा शहरातील बुथ प्रमुखांच्या विजय संकल्प मेळाव्यात निलंगेकर बोलत होते. मदनसुरी येथील मेळाव्यास प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, मध्यप्रदेश भाजपचे राजीव पटेल, विधानसभा प्रभारी व्ही.एन.माधव, विधानसभा प्रभारी दगडू सोळुंके, तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे,बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, जेष्ठ कार्यकर्ते मधुकर माकणीकर, माजी जि.प.सदस्य संतोष वाघमारे, अरविंद पाटील जाजनूरकर तर हलगरा येथे नरसिंग बिराजदार, तानाजी बिराजदार, सिद्धेश्वर पवार, मधुकर पाटील, रियाज सौदागर, लक्ष्मण शेळके, दुष्यंत सगरे, अभिषेक हलगलकर, संजय पाटील, माधव शेळके, नागेंद्र पाटील उपस्थित होते. तर औराद येथे डॉ. मल्लिकार्जुन शंकद, व्यंकट गीर, रज्जाक रक्षाळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रशांत जगतापांच्या उमेदवारीला मविआकडून स्पीडब्रेकर; मतदारसंघाबाहेरच्या उमेदवाराचा मुद्दा गाजणार ?
यावेळी मार्गदर्शन करताना निलंगेकर म्हणाले की, बुथप्रमुखांनी मतदार यादीचा बारकाईने अभ्यास करावा. त्यानुसार मतदारांशी संपर्क साधावा. केंद्र आणि राज्यातील सरकारने केलेली विकासकामे मतदारांना सांगावीत. ही कामे सांगताना मतदारांशी विश्वासाने बोला. आपला पक्ष आणि उमेदवार विकासकामे करण्यासाठी सक्षम आहे. याउलट काँग्रेसने आजपर्यंत कोणती विकास कामे केली ? हे देखील मतदारांना विचारा. मागील दहा वर्षात केलेली सरकारची कामे तुम्ही मतदारांना सांगितल्यानंतर त्यांच्या शंकांचे निश्चितपणे समाधान होईल. यामुळे विरोधी पक्षाचे मतदारही भाजपॉकडे वळतील, असे आ.निलंगेकर म्हणाले.
ते म्हणाले की, बुथप्रमुखांनी गाफील न राहता काम करावे. विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक बुथ प्रमुखाने आपले संपूर्ण मतदान करून घ्यावे. त्यानंतरच इतरांचे मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. बुथ प्रमुखांनी ८० टक्केपेक्षा अधिक मतदान करून घ्यावे, असं आवाहनही निलंगेकर यांनी केले.
या मेळाव्यास बूथ प्रमुख, भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.