Download App

पूजा खेडकर यांच्यावर ‘केंद्रा’चीही वक्रदृष्टी; तपास सुरू, दोन आठवड्यात रिपोर्ट येणार

केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर डीओपीटीचे अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांनी चौकशी (UPSC) सुरू केली आहे.

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त ठरलेल्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या (Pooja Khedkar) अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणात आता केंद्र सरकारची एन्ट्री झाली आहे. केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर डीओपीटीचे अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांनी चौकशी (UPSC) सुरू केली आहे. दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करुन अहवाल सादर करावा लागणार आहे. पदाच्या दुरुपयोगाचे आरोप झाल्याने पूजा खेडकर मोठ्या वादात सापडल्या आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चौकशीत जर पूजा खेडकर दोषी आढळल्या तर त्यांच्यावर बरखास्तीची कारवाई होऊ शकते. इतकेच नाही तथ्य लपवणे आणि चुकीची माहिती दिल्याचे आरोप सिद्ध झाले तर अपराधिक कारवाई देखील होऊ शकते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक टीम नियुक्त केली आहे. पूजा खेडकर यांनी चुकीच्या पद्धतीने ओबीसी कोट्याचा वापर केला आहे किंवा नाही याची चौकशी ही समिती करणार आहे. या कमिटीलाही दोन आठवड्यांच्या आत आपला अहवाल केंद्राला सादर करायचा आहे.

Pooja Khedkar : पूजा खेडकर पुणे व्हाया वाशिम.. रुजू होताच म्हणाल्या, सॉरी मी..

पूजा खेडकर यांच्यावर कोणते आरोप?

वादग्रस्त अपगंत्व प्रमाणपत्र देऊन IAS ची पोस्ट मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. शिवाय वडिलांची 40 कोटींची संपत्ती असूनही त्यांनी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र जोडल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. तब्बल सहावेळा पूजा खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वैद्यकीय चाचणीला उपस्थित राहण्याचे टाळले. तसेच नुकतीच बदली झालेल्या वाशिमला देखील त्या रूजू झालेल्या नाहीत. खेडकर हे व असे अनेक कारनामे समोर येत आहेत.

पूजा खेडकर वाशिमला हजर

परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या थाटाला पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही वैतागले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या बाजूच्याच केबिनची मागणी करणे, वरिष्ठांचे अँटी चेंबर बळकावणे, घराच्या मागणीवर अडून बसणे, शिपाई आणि अन्य मदतनीसांची मागणी करणे, ऑडीसारख्या अलिशान गाडीतून ऑफिसला येणे, शिवाय याच खासगी गाडीला अंबर दिवा बसवून घेणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालणे अशा थाटात खेडकर यांचा पुण्यात वावर होता. शासनाने त्यांची बदली करावी अशी मागणीच जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केली होती. त्यानुसार खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली.

follow us