Download App

Eknath Shinde : मेरिटच्या आधारेच पक्ष अन् चिन्हाचा निर्णय; CM शिंदेंच्या अजितदादांना शुभेच्छा

Eknath Shinde reaction on Election Commission Decision : केंद्रीय निवडणूक आयोगाने काल मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. आयोगाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर भाष्य केले आहे.

शिंदे म्हणाले, जनता नेहमीच कामाला महत्व देते. जनतेला काम हवे आहे. राज्याचा चौफेर विकास होत आहे. पायाभूत सुविधेत महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहेत. लोकशाहीप्रमाणे मेरिटवर त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळाले. त्यांनी मी शुभेच्छा देतो. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील. सहानुभूती नाही तर लोक कामाला महत्व देत असतात. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मेरिटवर देण्यात आले होते. त्याची काय कारणं आहेत याचा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे.

मोठी बातमी! अजित पवार गटाला ‘पक्ष’ आणि ‘चिन्ह’ मिळालं, निवडणूक आयोगाचा निर्णय

या निकालावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली. मी त्यांचे, सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालं आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar) गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर केला आहे. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला उद्या (7 फेब्रुवारी) चिन्हाबाबत माहिती देण्यास सांगितले आहे.

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पक्ष आणि चिन्ह कोणाला मिळणार याची उत्सुकता सर्वाना होती. आता पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याचे जाहीर झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आगामी निवडणुका वेगळ्या चिन्ह आणि नावाने लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अदृश्य शक्तींनी शरद पवारांकडून पक्ष हिसकावला; सुप्रिया सुळेंची जळजळीत टीका

follow us

वेब स्टोरीज