Download App

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; अभिनंदन महाराष्ट्र म्हणत, देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडेच मांडले

महाराष्ट्रात एप्रिल ते जून २०२४ दरम्यान ७०,७९५ कोटी रुपयांची परकी गुंतवणूक आली आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदर केलं आहे.

  • Written By: Last Updated:

Maharashtra FDI FY 2024-25 : गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्र सरकारवर टीका होण्याच प्रमुख कारण काय असेल तर ते म्हणजे, महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले हा विरोधकांचा आरोप. (FDI FY) त्याला उत्तर देता देता सत्ताधाऱ्यांचीही चांगलीच गोची झाली होती. दरम्यान आता मात्र, परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र गुजरातच्या पुढे असल्याचं समोर आलं आहे.

कोलकाता डॉक्टर बलात्कार अन् हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट; पीडितेच्या पालकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

या बाबतची बातमी समाजमाध्यमांवर शेअर करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच, महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदनही त्यांनी केलं आहे. फडणवीस यांनी म्हटलं आहे की २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या ५२ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यांपेक्षा अनेक पटींनी अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी फडणवीस यांनी आपल्या ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये शेअर केली आहे.

राज्यावर मेघराजा मेहरबान! राज्यातील मोठी धरणं प्रथमच काठोकाठ; पाच वर्षांनंतर १०० टक्के जलसाठा

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, अतिशय आनंदाची बातमी! देशातील एकूण गुंतवणुकीच्या ५२,४६ टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. मागील दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक १ वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे. एप्रिल ते जून २०२४ या पहिल्या तिमाहीत एकूण ७०,७९५ कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे.

इतर राज्यांच्या तुलनेत अधिक गुंतवणूक

फडणवीस यांनी म्हटलं आहे की ‘या सर्व राज्यांमधील परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही १,३४,९५९ कोटी रुपये इतकी असून, त्यापैकी ७०,७९५ कोटी अर्थात ५२.४६ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये राज्यात १,१८,४२२ कोटी, (कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक) २०२३-२४ मध्ये १,२५,१०१ कोटी (गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात+कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक) रुपयांची परकीय गुंतवणूक आली होती?.

वेगवेगळी राज्ये व त्यांना मिळालेली परकीय गुंतवणूक

महाराष्ट्र – ७०,७९५ कोटी रुपये
कर्नाटक – १९०५९ कोटी रुपये
दिल्ली – १०,७८८ कोटी रुपये
तेलंगणा – ९०२४ कोटी रुपये
गुजरात – ८५०८ कोटी रुपये
तामिळनाडू – ८,३२५ कोटी रुपये
हरयाणा – ५८१८ कोटी रुपये
उत्तरप्रदेश – ३७० कोटी रुपये
राजस्थान – ३११ कोटी रुपये

follow us