Katrina Kaif: चाहत्यांनी कतरिना कैफला विमानतळावर घेरलं अन्… Video Viral

Katrina Kaif: चाहत्यांनी कतरिना कैफला विमानतळावर घेरलं अन्… Video Viral

Katrina Kaif: बॉलीवूडमध्ये सर्वाना आपल्याला तालावर नाचवणारी अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) कायम सोशल मीडियावर (social media) सक्रिय असते. परंतु गेल्या काही दिवसाखाली अभिनेत्रीलाही नुकताच काहीसा वेगळा अनुभव आला आहे. (video viral) मुंबई विमानतळावरचा (Mumbai Airport)  कतरिना सेल्फी घेण्यासाठी आलेल्या तिच्या चाहत्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. लाखो चाहते कतरिनाच्या सौंदर्यावर आणि तिच्या हटके स्टाईलवर घायाळ होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝑲𝒂𝒕𝒓𝒊𝒏𝒂 𝑲𝒂𝒊𝒇 ♥️✨ (@sizzlingkatrina_)


परंतु सर्व चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी कतरिना कैफ किती शिकली आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? कतरिना कैफचा मुंबई विमानतळावरील ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओत कतरिनाने डेनिमसह तपकिरी रंगाचा शीअर टॉप घटल्यावचा दिसून आली आहे. तसेच विमानतळावर कतरिनाला बघताच तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच कतरिनाही चाहत्यांना सेल्फी देत होती.

परंतु ज्या वेळेस गर्दी वाढली आणि चाहत्यांनी कतरिनाला चारही बाजूंनी घेरले. तर त्यावेळेस तिला बाहेर पडणे खूपच कठीण झाल्याचे दिसून आले आहे. अखेर कतरिनाला गर्दीतून बाहेर काढण्यासाठी सुरक्षारक्षकांना चाहत्यांना बाजूला ढकलावे लागले असल्याचे दिसून आले आहे. आंणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. तसेच कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत सुट्टीसाठी न्यूयॉर्कला गेली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी विकी आणि कतरिनाचा एका चाहत्यासोबतच फोटो व्हायरल झाला होता.

Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले

ज्यामध्ये दोघेही कॅज्युअल लूकमध्ये फॅन्ससोबत पोज देताना दिसले. हा फोटो फॅन पेजने शेअर केला आहे. कतरिनाच्या वर्कफ्रंटविषयी सांगितलं झाले आहे की, गेल्या काही दिवसाअगोदर तिचा ‘फोन भूत’ सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाविषयी तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर हे मुख्य भूमिकेमध्ये होते. आता ती लवकरच विजय सेतुपतीसोबत ‘मैरी क्रिसमस’मध्ये दिसून येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube