देशाच्या अनेक भागात पावसाचे थैमान; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्र्ता काय स्थिती?

  • Written By: Published:
देशाच्या अनेक भागात पावसाचे थैमान; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्र्ता काय स्थिती?

Maharashtra Rain Updates Today : देशाच्या अनेक सध्या भागात पूर आणि पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मध्य महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि राजस्थानसह (Maharashtra Rain) आठ राज्यांमध्ये आज अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यावर मेघराजा मेहरबान! राज्यातील मोठी धरणं प्रथमच काठोकाठ; पाच वर्षांनंतर १०० टक्के जलसाठा

याचबरोबर दुसरीकडे अरबी समुद्रातील आर्द्रता आणि पूर्वेकडील उष्णतेमुळे तीव्र हवामानाचा सामना करणाऱ्या आंध्र प्रदेशात सुमारे सहा लाख लोकांना स्थलांतर करावं लागलं आहे.

मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे. नाशिकमधील इगतपुरी येथे ५३ मिलिमीटर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा येथे ९७ मिलिमीटर, तर माले, मुठे ३२, भोलावडे, निगुडघर ३१, कार्ला ६५, लोणावळा ४८, पानशेत ३५, विंझर ४२ मिलिमीटर, साताऱ्यातील लामज येथे ५० मिलिमीटर, सांगलीतील चरण येथे ३१ मिलिमीटर पाऊस झाला. कोल्हापुरातील आंबा येथे ९४ मिलिमीटर, तर करंजफेन ३१, मलकापूर ३५, राधानगरी ३२, गगनबावडा ३० मिलिमीटर पाऊस झाला. उर्वरित भागात ढगाळ वातावरण असून अधूनमधून शिडकावा होत आहे.

मोठी बातमी ! मुंबईतील टाईम्स टॉवरला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

अनेक ठिकाणी पावसाची उघडीप होती. घाटमाथ्यावरही जोर वाढला असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला कोकणात पावसाचा जोर वाढला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर हलका ते मध्यम सरी बरसल्या. तर ठाणे, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात कमीअधिक पाऊस पडला. ठाणेतील ठाणे शहर येथे ४१ मिलिमीटर, तर मुंब्रा ३१ मिलिमीटर, पालघरमधील डहाणू, मालयण, कसा, खोढला, तलवड येथे ३२ मिलिमीटर, तर तलसरी ३१ मिलिमीटर पाऊस झाला. सिंधुदुर्गमधील भुईबावडा येथे ३० मिलिमीटर पाऊस झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube