Download App

मोठी बातमी! आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेसाठी उभारणार स्वतंत्र यंत्रणा; गिरीष महाजनांची घोषणा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा एमपीएससीमार्फत होत आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यानुसार आता आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

CM शिंदे अन् भाजपाच्या शिलेदारांना अभ्यासाची अधिक गरज; खाते वाटपापूर्वी आमदारांची ‘प्रगती’ समोर

अ आणि ब गटाच्या परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून घेतल्या जातील, असे सांगण्यात येत आहे. अधिक्षक, डॉक्टर अशा मोठ्या पदांच्या यामध्ये समावेश आहे. पण आरोग्य विभागातील क आणि ड गटाच्या परीक्षा या नियमित होतात तशाच होतील, असेही ते म्हणाले.

UCC मुळे हिंदुंचेच नुकसान होणार; ओवैसींनी सांगतिले त्यामागील कारण

प्रत्येक जिल्ह्याध्ये मेडीकल कॉलेज, प्रत्येक जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे अशी मोदींची संकल्पना आहे. त्यामुळेच आम्ही आता 11 वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परवाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही 9 महाविद्यालयाला परवानगी दिली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवशक्यता भासणार आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारणार असे आरोग्यमंत्री  म्हटले आहे. या निर्णयामुळे आरोग्या विभागाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज