विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे फिक्स? ‘बॉस इज ऑलवेज राईट’ म्हणत नार्वेकरांनी सर्वकाही सांगितलं

Milind Narvekar On Uddhav Thackeray : राज्यात 9 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे

Milind Narvekar On Uddhav Thackeray

Milind Narvekar On Uddhav Thackeray

Milind Narvekar On Uddhav Thackeray : राज्यात 9 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपकडून पाच जणांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी मंत्री बच्चू कडू यांना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उमेदवारी कुणाला? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. सध्यातरी महाविकास आघाडीकडून राज्याचे माजी मंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Elections) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता दोन दिवस उरले असताना उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि सचिव मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु झाली आहे.

मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार असतील याची 99 टक्के खात्री आहे. पण ठाकरे (Uddhav Thackeray) असल्याने एक टक्क्याबद्दल सांगता येत नाही. तरीही बॉस इज ऑलवेज राईट हे विसरुन चालणार नाही असं मिलिंद नार्वेकर म्हणाले. नार्वेकर यांच्या या विधानानंतर पुढील काही तासात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेवर जावे अशी मागणी देखील शिवसेनेतून करण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. जर उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी उमेदवार नसतील तर काँग्रेस या जागेवर उमेदवार देणार असल्याची देखील चर्चा सुरु आहे.

VSR विमान प्रवासावरून राजकारण तापलं; खासदार पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण, ही केवळ प्रशासकीय चूक

विधान सभेच्या संख्याबळानुसार, भाजपला 9 पैकी 5 तर शिवसेना शिंदे गटाला 2 आणि अजित पवार गट आणि महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक – एक उमेदवार विजयी होणार आहे.

Exit mobile version