Download App

फडणवीसांनी फोन केला पण, मोदींनी रिस्पॉन्स नाही दिला; ‘त्या’ फॅक्टरचा भाजपला विदर्भात धक्का

लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली. महाराष्ट्रात तर महायुतीला मोठे हादरे बसले.

Elections Results 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपाची दाणादाण उडाली. महाराष्ट्रात तर महायुतीला मोठे हादरे बसले. भाजपाला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. राज्यातील भाजपाचं प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिलं. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबईत भाजपाची मोठी पिछेहाट झाली. विदर्भातही मोठा फटका बसला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगळता विदर्भात भाजपचे सगळेच उमेदवार पडले. आता भाजप आणि महायुतीच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक जुन्ना प्रसंग चर्चेत आला आहे. जर फडणवीसांचा हा डाव चालला असता तर विदर्भात कदाचित भाजपवर अशी नामुष्कीची वेळ आली नसती असे सांगितले जात आहे.

Lok Sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत नारायण राणेंनी मारली बाजी, विनायक राऊतांचा पराभव

राज्यात महायुतीला मोठा झटका बसला आहे. विदर्भात भाजपवर मोठी नामुष्की ओढवली आहे. मागील निवडणुकीत एनडीएनं दहा जागा लढवल्या होत्या त्यातील 8 जागांवर यश मिळालं होतं. यंदा चित्र पूर्ण बदललं आहे. महाविकास आघाडीने दहा पैकी 7 जागा जिंकत भाजपचं वर्चस्व संपुष्टात आणलं.

2019 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपनं सहा जागा लढवत पाच जागा जिंकल्या. 2024 मध्ये सात जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र अमरावती, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघात भाजपाचा दारुण पराभव झाला. या पराभवामुळे भाजपाच्या चार जागा कमी झाल्या आहेत. येथील धनगर, माळी आणि कुणबी समाजाची लक्षणीय संख्या पाहता कुणबी समाजातील नेत्याला मंत्रिमंडळात संधी मिळायला हवी यासाठी फडणवीसांनी फिल्डिंग लावली होती.

यासाठी त्यांनी जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला होता. परंतु, मोदींनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. विदर्भातील कुणबी समाजाची मतं आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांचा हा प्लॅन होता. मात्र तो यशस्वी ठरला नाही. त्यामुळे विदर्भात अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं पानिपत झालं अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

LokSabha Election Result : मुंबईत कॉंग्रेस अन् ठाकरेंचा दबदबा; शिंदे-भाजपने दोनच जागा राखल्या 

follow us