पुन्हा मोदीचं; पण शाह, गडकरींना मोठी लॉटरी, महाराष्ट्रात काय होणार ? ज्योतिष अभ्यासकांचे भाकीत

  • Written By: Published:
पुन्हा मोदीचं; पण शाह, गडकरींना मोठी लॉटरी, महाराष्ट्रात काय होणार ? ज्योतिष अभ्यासकांचे भाकीत

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) अखेरचा सातवा टप्पा उद्या पार पडत आहे. देशात कुणाची सत्ता येईल, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालावर सट्टेबाजारही जोरात आहे. तर ज्योतिष अभ्यासकही वेगवेगळे भाकीत मांडत आहे. पुण्यातील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनीही भाकीत वर्तविले आहे. मारटकर यांच्या भाकितानुसार देशात पुन्हा भाजप सत्तेवर येईल. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होतील. परंतु वेगवेगळे बदलही होतील, असे भाकीत मारटकर यांचे आहे. (Modi in the country; But Shah, Gadkari’s lottery of deputy prime ministership? There will be chaos in Maharashtra, astrologers predict)

लोकसभा निवडणुकीचे मतदान व निकालाच्या वेळेचे ग्रहमान एनडीए आघाडी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनुकूल आहे. त्यामुळे एनडीए आघाडीला (NDA) 350 हून अधिक जागा मिळतील. नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे भाकीत मारटकर यांचे आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधानपदाची संधी आहे, असे भाकीत मारटकर यांनी वर्तविले आहे.

इंडिया आघाडीला किती जागा, महाराष्ट्रात काय होणार ?

काँग्रेस पक्षाला 60 ते 80 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 160 ते 180 जागा मिळण्याची शक्यता राहील, असे भाकित मारट
करांचे आहे. महाराष्ट्रात काय होईल, याचे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.

Loksabha Election 2024 : वर्धा लोकसभेमध्ये पुन्हा ‘कमळ’ फुलणार की ‘तुतारी’ वाजणार?

महाराष्ट्रात महायुतीला मागील वेळेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. 28 ते 31 जागा महायुतीला आहे. तर महाविकास आघाडीला 17 ते 20 जागा मिळण्याची शक्यता राहील. निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होतील. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व बदलण्याची शक्यता राहिल .उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या लोकसभेतील सध्याच्या जागा कायम राहतील तर भाजप व शिवसेना(शिंदे गट)यांच्या काही जागा कमी होण्याची शक्यता वाटते,असे सिद्धेश्वर मारटकर यांनी आज सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Prajwal Revanna : मोठी बातमी! प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपर्यंत गोंधळ, पक्षांतर घडणार
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी पुढील काळात वाढण्याची शक्यता असून पुढील काळात मोठ्या राजकीय व्यक्तीना तुरुंगवास होण्याची शक्यता राहील. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत गोंधळाचे राहणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पक्षांतराच्या घटना मोठ्या प्रमाणावर होतील,असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे. मारटकर यांची अनेक राजकीय भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube