Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात आता राज्यातील महायुती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये म्हणजे एनडीए (NDA) आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे सोमवारी तातडीने दिल्लीत दाखल झाले. महाराष्ट्रातील भाजपचे काही नेतेही दिल्लीत आहेत. हे नेते व राज ठाकरे यांची गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या घरी बैठक होणार आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आता माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मला काही माहितीही नाही. मला फक्त या असं सांगितलं गेलं त्यामुळे मी येथे आलो, असे राज ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Raj Thackeray : आरक्षण देण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला आहे का? राज ठाकरेंचा सवाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारीच दिल्लीत गेले आहे. त्यानंतर राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीमध्ये गेल्यास त्यांना दोन लोकसभा जागा दिल्या जाऊ शकतात. दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेला हवे आहेत.
महायुतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) हाही महत्त्वाचा पक्ष आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा एकमेंकाना भेटलेले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना बरोबर घेण्यास तयार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारपरिषदेत राज ठाकरे आमची विचारधारा मानणारे नेते आहेत. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
Electoral Bonds : 21 मार्चपर्यंत पूर्ण माहिती द्या; इलेक्टोरल बाँड्सवरून SC ने पुन्हा SBI फटकारले