मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, वाघ ताडोब्याचा असो की शिवसेनेचा जखमी असेल तर..

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने  (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेत्यांनी भाजप (BJP) व शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की जखमी वाघांसाठी रेस्क्यू सेंटर करत आहोत. तेथे जखमी वाघांवर उपचार […]

Sudhir Mungantiwar

Sudhir Mungantiwar

Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने  (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेत्यांनी भाजप (BJP) व शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की जखमी वाघांसाठी रेस्क्यू सेंटर करत आहोत. तेथे जखमी वाघांवर उपचार केले जातील. शिवसेनेच्या जखमी वाघांचे काय असाही प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले, की वाघ कोणताही असो जखमी असेल तर त्याचा इलाज करावाच लागतो,असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

ते पुढे म्हणाले, की ‘वाघ कोणताही असो त्याचे स्थानांतरण करण्याची गरज आहे. मग तो ताडोब्यातला वाघ असो किंवा राजकारणातला वाघ असो. त्याचे स्थानांतरण योग्य ठिकाणी करणे ही आमची जबाबदारी आहे आणि ती आम्ही योग्य पद्धतीने पार पाडत आहोत.’

Sudhir Mungantiwar : दाढी बढाने से नही… बुद्धी बढाने से प्रधानमंत्री होता है!

ताडोब्यातील वाघांचे स्थानांतरण करण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केला आहे. ताडोब्यात वाघ आहेत ते दुसऱ्या जंगलात नेले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांना शिवसेनेच्या (Shiv Sena) वाघांचे स्थानांतरण केले का, असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, की ‘चाळीस वाघ झाले ना स्थलांतरीत आणि ते ही योग्य ठिकाणी झाले, तेच त्यांच्यासाठी जास्त पोषक आहे,’ असे त्यांनी सांगितले.

हे वाचा : Eknath Shinde यांना शिवसेना प्रमुख म्हणून संबोधले जाणार? गुलाबराव पाटील म्हणाले, ते पद

दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणात निवडणूक आयोगाच्या निर्णयाचीच जास्त चर्चा आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली आहे. या मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते केंद्र सरकार, भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आहेत. दुसऱ्या गटाच्या नेत्यांकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.

Exit mobile version