Sudhir Mungantiwar : दाढी बढाने से नही… बुद्धी बढाने से प्रधानमंत्री होता है!
पुणे : गुजरातमध्ये (Gujrat) १९९३ साली चिमणभाई पटेल (Chimanbhai Patel) हे मुख्यमंत्री असताना गौतम अडाणी (Gautam Adani) यांना त्यांनी १० पैसे मिटरने जमीन दिली होती. छबिलदास मेहता (Chhabildas Mehta) हे मुख्यमंत्री असताना मुद्रा पोर्टचे (Mudra Port) काम सुरु करण्यासाठी परवानगी हे काँग्रेसने (Congress) दिली होती. नुसते अडाणी… अडाणी करू नका. अडाणी केव्हा मोठा झाला हे तुम्हाला माहिती नाही का, असा सवाल उपस्थित करत ‘दाढी बढाने से कोई प्रधानमंत्री नही होता, बुद्धी बढाने से प्रधानमंत्री होता है, अशा शब्दात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हल्लाबोल केला.
कसबा पेठ मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार सभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की, कसबा गणपतीचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्याने हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे. तसेच २०२४ च्या विधानसभेच्या लढाईचा शुभारंभ होईल, हा माझा विश्वास आहे.
वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसच्या लोकांना आणि राहुल गांधी यांनी जरा इतिहास तपासून पाहावा आणि मग बोलावे. नुसते नुसते अडाणी… अडाणी म्हणून काही होणार नाही. केवळ लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचे काम काँग्रेस करत आहेत. त्याने काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी काँग्रेसला आणि राहुल गांधी यांना अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी आपल्या विचारात, आचारत बदल करण्याची नितांत गरज आहे, असा टोला देखील लगावला.