Maharashtra Rain Update : महाराष्ट्र पावसाने भिजला! 29 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी…

राज्यात मान्सूनची प्रतिक्षा संपली असून दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुखावणारी आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालायं.

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update : मागील अनेक दिवसांपासून राज्यात मान्सूनची प्रतिक्षा (Rain) होती, अखेर दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्र सुखावला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून राज्यातील 29 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आा आहे. मुंबईमध्ये पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून लोकलवरही परिणाम झाल्याचं चित्र आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान पहिल्याच पावसाचा फटका मुंबईकरांना बसला असून ठिकठिकाणी पाणी पोचल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकलसेवेवरती देखील परिणाम झाल्याचे समोर आले.

रोहित शर्माला पद्मश्री, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगर, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, सातारा घाटमाथा आणि पुणे जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

मॉन्सूनने पालघर ते वर्धा या पट्ट्यापर्यंत मजल मारली असून कोकण, मराठवाड्यासह राज्याचा बहुतांश भाग व्यापला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातील उर्वरित भागांसह गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांतही मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 21 जूनला राज्यात मान्सूनची तूट सर्वाधिक म्हणजेच 72 टक्के इतकी नोंदवली गेली होती.

खासदार निधीबद्दल वेगवेगळे आरोप; माध्यमांसमोर येत ओमराजे निंबाळकरांनी हिशोबच मांडला

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस
मुंबई उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. काल संध्याकाळपासून कांदिवली, मालाडसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कांदिवलीतील गणेश नगर आणि मालाड पूर्व येथील कुरार गावातील कोंकणी पाडा या भागात पावसाचे पाणी साचले आहे.

गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे ही तूट 13 टक्क्यांनी भरून आता 58.8 टक्क्यांवर आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, 23 जूनपर्यंत सरासरी पावसाचे सामान्य प्रमाण 24 इंच इतके असते. यंदा या कालावधीत आतापर्यंत 10.8 इंच इतका पाऊस पडला असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढल्यास ही तूट आणखी वेगाने भरून निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी पडझड झाली. मंगळवारी जोरदार पाऊस बरसला. यंदाच्या हंगामात 24 तासांत सर्वाधिक म्हणजेच 3.4 इंच इतक्या पावसाची नोंद झाली.

Exit mobile version