Chandrashekhar Bawankule on Sand Theft : राज्यात एम सँड म्हणजे कृत्रिम वाळूबाबत (Sand) धोरण आणलं जाईल अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होत. अखेर ते धोरण आता राज्यभरात लागू होणार असून उद्यापासून प्रत्येक जिल्ह्यात 50 क्रेशर देण्यात येणार आहेत अशी माहितीही बावकुळे यांनी आज विधानसभेत बोलताना सांगितलं.
त्याचवेळी बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यात वाळू चोरी होते का तर होते. हे मी मान्य करतो. मात्र, हा बदल काही एका दिवसात किंवा वर्षात होणार नाही. त्याला वेळ लागणार आहे. आता उद्यापासून आपण राज्यात क्रेशर देत आहोत. तसंच, मागणी तेव्हडी वाळू पुरवठा होत नसल्याने वाळू चोरी होत आहे. त्यामुळे ही चोरी संपवायची असेल तर आपल्याला मागणी तेव्हडी वाळू पुरवण हे राज्याच धोरण आहे असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.
शासनाची योजना बसवली ढाब्यावर; बीडमध्ये मोफत नाही तर, मोठी रक्कम घेऊन मिळते वाळू