Download App

पवारांचा मास्टरस्ट्रोक! .. म्हणून राष्ट्रवादीत नेमले दोन कार्यकारी अध्यक्ष

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पक्षाच्या वर्धापनदिनी पुन्हा एकदा मोठी राजकीय खेळली. त्यांच्या या खेळीची राजकारणात (Maharashtra Politics) जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.

तसेही त्यांनी भाकरी फिरवण्याचे संकेत काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानुसार धक्कादायक निर्णय घेण्यासही सुरुवात केली होती. मध्यंतरी स्वतः पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला जोरदार विरोध झाला. त्यामुळे कार्यतकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर आज पवार यांनी पुन्हा एक तडाखेबंद निर्णय जाहीर करून टाकला.

या निर्णयावर राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यांनी असं का केलं. ते नाराज तर नाहीत ना, अशा चर्चा आता होत आहेत. त्याचे उत्तर लवकरच मिळेल मात्र आताच्या घडीला शरद पवार यांनी हा निर्णय का घेतला, यामागची महत्वाची कारणे काय, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू या.

खासदार सुप्रिया सुळे यांची आज कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली. त्यांनी संसदेत पक्षाचे प्रतिनिधित्व केले आहे. ठोस भूमिका घेण्यावर त्यांचा भर असतो. पण, राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी त्यांच्याकडे नव्हती. आता मात्र ही जबाबदारी त्यांना मिळाली आहे. या माध्यमातून त्यांना आता अधिक जोमाने काम करण्याची संधी मिळेल.

अजित पवार पुन्हा नाराज? रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

अजितदादा राज्यात तर सुप्रिया सुळे राष्ट्रीय पातळीवर काम करतील हे पक्षात ठरलेलेच आहे. पण, आज बऱ्याच जणांनी अजितदादा नाराज असल्याचे बोलले जात असल्याचे म्हटले. पण, वरील गोष्टीचा विचार केला तर खरंच नाराज असतील असे वाटत नाही. शरद पवार यांनी सध्या कार्यकारी अध्यक्षपदी दोघांची नियुक्ती केली. म्हणजे, सुळे या एकट्याच उत्तराधिकारी असतील या चर्चांना पूर्णविराम दिला.

कार्यकारी अध्यक्षपदी दोघांची नियुक्ती केली असली तरी या निर्णयातून सुप्रिया सुळे याच आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उत्तराधिकारी असतील हे ध्वनित होत आहे. कार्यकारी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अजित पवार यांना बाजूला काढून येथून पुढे पक्षाची सूत्रे सुप्रिया सुळे यांच्याकडे जातील, असा संदेश दिला आहे.

या निर्णयात पक्षांतर्गत सत्ता समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत दोन गट असल्याचे दिसून आले. या दोन्ही गटाच्या नेत्यांना कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले.

कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे अन् प्रफुल्ल पटेल यांची निवड का? शरद पवारांनी सांगितलं कारण

अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर पहाटे शपथविधी उरकला. तेव्हापासून त्यांच्याबद्दल वावड्या उठत असतात. मध्यंतरी ते भाजपात जाणार असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे कार्यकारी अध्यक्ष नेमून शरद पवार यांनी एकप्रकारे त्यांना संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us