‘मला या विषयावर बोलायचं नाही’ ; शरद पवारांनी ‘त्या’ घटनेवर बोलणेच टाळले

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशातील या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविणाऱ्या घटनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकार हल्लाबोल सुरू केला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]

Sharad Pawar

Sharad Pawar

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. योगी आदित्यनाथांच्या उत्तर प्रदेशातील या कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडविणाऱ्या घटनेवर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकार हल्लाबोल सुरू केला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र जास्त बोलण्यास नकार दिला आहे.

Atiq Ahmed चे मारेकरी म्हणाले, मर भी जाते तो कोई गम नहीं…

आज पुण्यात या प्रकरणावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांना उत्तर प्रदेशातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला. मात्र, शरद पवार यांनी मला या विषयावर काहीच बोलायचे नाही, असे सांगत आणखी काही बोलण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.

शनिवारी रात्री तिघा जणांनी पत्रकारांच्या भूमिकेत अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजमध्ये नेत असताना त्यांची हत्या केली. तिघांनी जवळपास 17 राऊंड गोळीबार केल्याचे समजते आहे. या गोळीबारात अतिक आणि त्याच्या भावाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील बिघडलेली कायदा सुव्यवस्था आणि एकूणच राज्य सरकारच्या कारभारावर विरोधक घणाघाती टीका करत आहेत. सोशल मिडीयातही याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

घटनेत धक्कादायक खुलासे

मारेकऱ्यांनी चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी प्रयागराजमधील एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. इतकेच नाही तर तिघांनीही येथे आठवडाभर अभ्यास केला. चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींनी पोलिसांकडे अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. उत्तर प्रदेशात सध्या सर्वत्र जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. राज्यात सध्या प्रचंड तणावाची परिस्थिती आहे.

Exit mobile version