NCP Hearing in Supreme Court : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत आज (NCP Hearing in Supreme Court) एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. या सुनावणीत अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर द्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवार गटाला दिले आहे. या निर्णया विरोधात शरद पवार गटाने (Sharad Pawar) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात आज या प्रकरणात सुनावणी झाली.
महायुतीतून अजितदादांचं ‘घड्याळ’ वगळलं तरीही मजबुती कायम; वाचा कशी आहे आकडेमोड!
या सुनावणीत अजित पवार गटाने या प्रकरणी दोन आठवड्यात उत्तर दाखल करावे. या उत्तरावर शरद पवार गटाला काही प्रतिवाद करायचा असेल तर त्यांनी एक आठवड्याच्या आत दाखल करावा असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात पुढील सुनावणी आता 6 ऑगस्ट रोजी होणार आहे. आता अजित पवार गटाकडून काय उत्तर दाखल केले जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सध्या पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाच्या ताब्यात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात दिलं होतं. या निवडणुकीत शरद पवार गटाने दहा उमेदवार दिले होते. त्यातील आठ उमेदवार निवडून आले. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीतही याच चिन्हावर निवडणुका लढतील अशी शक्यता आहे.
यात निवडणूक आयोगाने मोठा दिलासा देत शरद पवार पक्ष आणि तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाला मान्यता निवडणूक आयोगाने दिली. आता आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला याच चिन्हावर निवडणुका लढाव्या लागू शकतात. मात्र तरीदेखील मूळ पक्ष आणि चिन्हासाठी शरद पवार गटाने न्यायालयातील लढाईही सुरुच ठेवली आहे.
माझ्यावर शरद पवारांचे अनेक उपकार, पहिल्यांदा त्यांनीच मंत्री केलं, अजितदादा गटाच्या नेत्याचं विधान