Download App

कोर्टाला 10 तर, आयोगाला 6 महिने लागले; मग मी दोन…

सत्तासंघर्षाबाबत सर्वो्च्च न्यायालायाला निर्णय घ्यायला 10 महिने लागले, निवडणूक आयोगाला 6 महिने लागले मग मी 2 महिन्यात निर्णय कसा देऊ शकतो, असं वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं आहे. लंडनहुन भारतात दाखल झाल्यानंतर आज राहुल नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाबद्दल भाष्य केलंय.

तसेच मी कोणत्याही दबावाखाली काम करीत नसून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना आणि संविधानिक तरतूदींच्या आधारेच निर्णय होणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठणकावून सांगितलं आहे.

मोठी बातमी : पुण्यात अतिक्रमण कारवाईदरम्यान जमावाची पालिकेच्या कर्मचाऱ्याला जबर मारहाण

राहुल नार्वेकर म्हणाले, ज्यावेळी आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यावेळी पक्षाचं प्रतिनिधीत्व कोणाकडे होतं? निवडून आलेल्या सदस्यांचं बहुमत कोणाकडे? यासंदर्भात निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचाही अभ्यास करावा लागणार आहे. त्यावेळी नेतृत्व कोणाकडे होतं? ठाकरे गट की शिंदे गट हेही तपासल्यानंतर राजकीय पक्षाचा कोण अधिकृत व्हिप होता हेही तपासावे लागणार असल्याचं राहुल नार्वेकरांनी सांगितलं आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात SIT स्थापन; फडणवीसांची मोठी घोषणा

त्यानंतरच सीपीसी, सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन्स आणि संविधानिक तरतूदींच्या आधारे निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत निर्णय घेताना त्यावेळी राजकीय पक्षाची काय इच्छा होती याचीही चौकशी करावी लागणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, 2022 साली राजकीय पक्षाचं कोण नेतृत्व करीत होतं तो निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निकालाचा अभ्यास करावं लागणार आहे. राजकीय पक्षाचं नेतृत्व कोण करीत होतं, याबाबत निर्णय झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. माझ्याकडे ५४ आंमदारांविरोधात ५ याचिका असून यावर लवकरच निर्णय घेणार आहे.

NIA Raid : धार्मिक कट्टरतावाद पसरवणाऱ्या 16 जणांना अटक, धक्कादायक माहिती समोर

दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर सोपवलीय. त्यामुळे आम्ही लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करु पण घाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विधानसभेच्या बाहेर जे लोकं वक्तव्य करताहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नसून किंमतही देत नसल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

https://www.youtube.com/watch?v=VdbU2GagpB0

संविधानिक तरतूदींनूसार आमदारांच्या अपात्रतेबाबत जो निर्णय होईल तो घटनाबाह्य होणार नसून यामध्ये कुठलाही पक्षपात न करता निर्णय होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.शिवसेना पक्षाच्या घटनेचा अभ्यास करणार आहे. तसेच भरत गोगावले यांची व्हिप म्हणून नियुक्ती घटनात्मक बाबींची पूर्तता करुनच नियुक्ती करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Tags

follow us