त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात SIT स्थापन; फडणवीसांची मोठी घोषणा

त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात SIT स्थापन; फडणवीसांची  मोठी घोषणा

Trimbakeshwar Temple :  त्र्यंबकेश्वरमध्ये उरुसाच्या वेळी इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न झाला. मंदिर प्रशासनाने या जमावाला रोखले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला. मात्र, आता यानंतर जमावावर कायदेशीर कारवाई करण्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची ब्राह्मण महासंघाने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहे. दोन दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात छत्रपती संभाजी महाजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत दडकफेक झाल्याने तिथे देखील दंगल झाली. यानंतर त्र्यंबकेश्वर येथे देखील असाच अन्य धर्मीयांकडून मंदिरात घुसण्याचा प्रयत्न झाला.

Devendrs Fadanvis : ‘पोपट आता मेलाय…’ 16 आमदारांच्या अपात्रतेवर फडणवीसांचं मोठं विधान

त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रेवशद्वारावर एकत्र झाल्याचा घटनेसंदर्भात एफआयर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

Gutami Patil च्या कार्यक्रमात पुन्हा राडा, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातूनन आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube