Download App

’54 टक्के लोक तुमच्या विरोधात, तुमची जाहिरातही खोटीच’; दानवेंचा शिंदेंवर घणाघात

Ambadas Danve criticized Eknath Shinde : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. विरोधक या जाहिरातबाजीवर सडकून टीका करत आहेत. यामध्ये आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची भर पडली आहे.

या जाहिरातीवरून दानवे यांनी सरकावर जोरदार प्रहार केले. दानवे म्हणाले, 54 टक्के जनता ही तुमच्या विरोधात, जाहिरात खोटी, जनतेच्या मनात धूळ फेकणारी. राजकारणात दोन आणि चार होत नसतं. तर कधी कधी दोन-दोन सहा पण होतात. तर कधी कधी दोन आणि दोनच राहतात, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

Shinde vs Fadnavis : सर्व्हेपेक्षा निवडणुकीतील कौल महत्वाचा; बावनकुळेंनी फेटाळला शिंदेंचा दावा

महाराष्ट्रातील जनता भाजप शिवसेनेला 46 टक्के मत त्यांच्या बाजूने दिल्याचे हे सांगत आहेत. तसेच राज्यातील 54 टक्के नागरिक हे त्यांच्या विरोधात असल्याचे सिद्ध होत आहे. म्हणून ही जाहिरात खोटी आहे. जनतेच्या मनात धूळ फेकणारी आहे. तुमचं हे सर्व्हेक्षणच तुमच्या विरोधात आहे, अशी घणाघाती टीका दानवे यांनी केली.

भुजबळही बरसले

शिंदेंच्या या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ म्हणाले, त्या जाहिरातीचं मला खरंच आश्चर्य वाटतं. अशा जाहिरातींमध्ये पंतप्रधान मोदी त्यांच्याबरोबर अमित शाह आणि नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या दोघांचे फोटो असायचे. पण मला आज आश्चर्य वाटले ते म्हणजे उपमुख्यमंत्री फडणवीस एकदमच गायब झाले. ही मोठी झेप आहे शिंदे साहेबांची.

काँग्रेसला राष्ट्रवादीची साथ! भारतात लोकशाही जिवंत आहे का?; ट्विटर प्रकरणी मोदी सरकारला सवाल

बाळासाहेबांची शिवसेना ते म्हणतात आणि बाळासाहेबांचा फोटो नसतो हे देखील आश्चर्यच आहे. शिंदे फडणवीसांना विसरले तर विसरू देत पण निदान बाळासाहेबांना तरी विसरू नये. याआधीही अनेक सर्व्हे आले. हा सर्व्हे कुणी केला याची मला काही कल्पना नाही.

Tags

follow us