Sanjay Raut News : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली आहे. या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.
Maharashtra Politics : बच्चू कडूंचा आरपारचा मूड? म्हणाले, मला फोन आलाय, आजच निर्णय घेणार
राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे नेते आता दिल्लीत का फिरत आहेत. जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळी दिल्लीचे हायकमांड आदेश द्यायचे आणि आम्ही येथे टीका करायचो. मग आता काय बदल झाला. खातेवाटपासून निधीवाटपापर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत. एकेकाळच्या इथल्या स्वाभिमानी नेत्यांना दिल्लीत पायधूळ झाडावी लागत आहे. शपथ घेऊन दहा दिवस उलटून गेले. एकनाथ शिंदेंच्या आमदारांना तर वर्ष उलटून गेले. त्यांच्या इतर लोकांनी जे कोट शिवले त्या कोटची साईज बदलली तरी विस्ताराची परवानगी मिळत नाही असा त्यांचा स्वाभिमान, अभिमान, हिंदुत्व त्यांनी एका कचऱ्याच्या पेटीत त्यांनी टाकून ठेवले आहे.
आपल्या लोकांना गब्बर करण्याचा अजितदादांना अनुभव
ज्या खात्यांचा आग्रह अजित पवार गटाने धरला त्या खात्यांसाठी त्यांना दिल्लीतील नेत्यांनीच शब्द दिला आहे. आता ही कमिटमेंट पू्र्ण होते की नाही हे आपण पाहू. अजितदादांना अर्थ खाते सांभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. मला त्यांच्यावर टीका करायची नाही. पण, अजित पवार यांना अर्थ खाते सांभाळण्याचा आणि आपापल्या लोकांना निधी वाटपातून गब्बर करण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यामुळे कदाचित मिंधे गटाच्या लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला असेल.
दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…
शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांवर टीका करून शिवसेना सोडली होती. आता त्याच अजित पवारांकडे निधी वाटपासाठी कागद घेऊन तुम्हाला जावे लागणार आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
मंत्रिमंडळ विस्तार केला तर असंतोषाचा भडका उडणार
मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही याचीच शंका आहे. कारण मंत्रिमंडळाचा विस्तार केला तर दोन्ही गटात असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या गटातले जे नेते मंत्री झाले आहेत ते सगळे वजनदार आहेत. त्यामुळे त्यांना तशीच खाती द्यावी लागतील. दुसरीकडे शिंदे गटातले आमदार आहेत ते किरकोळ आहेत त्यांना चणे कुरमुऱ्यावर भागवता येईल. त्यामुळे आताा विस्तार करणे म्हणजे नवीन असंतोषाला आमंत्रण देणे ठरेल, असे राऊत म्हणाले.