Download App

काँग्रेसकडून मविआ फोडण्याचे प्रयत्न, लवकरच धक्कातंत्र; भाजप खासदाराच्या गौप्यस्फोटाने खळबळ!

Maharashtra Politics : राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी आठ आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यानंतर आता काँग्रेसचं घर लवकरच फुटेल, असा दावा सत्ताधारी गटाचे आमदार करत असतानाच भाजप खासदाराने वेगळाच गौप्यस्फोट केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेसच्या आमदारांत अस्वस्थता आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील, असा खळबळजनक दावा भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात सहभागी होतील, असा दावा निंबाळकर यांनी केला आहे.

‘जायचं तर जा पण, पक्षाशी गद्दारी करू नका अन्यथा’.. उद्धव ठाकरेंचा फुटीरांना रोखठोक इशारा

माढा मतदारसंघातील श्रीपूर ते खंडाळी या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या लोकार्पणप्रसंगी त्यांनी हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. यावेळी माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे उपस्थित होते.

निंबाळकर पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे नेतृत्व सध्या काँग्रेसच्या हातात आहे. पण, शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्याबरोबर गेल्याने भविष्यात आपलेच नुकसान होईल अशी भीती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे लवकरच ते या महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, असा दावा निंबाळकर यांनी केला.

‘कुणी आमच्याकडं आलं तर आमचा दुपट्टा तयार’, बावनकुळेंकडून नव्या इनकमिंगचे संकेत

कुणी आमच्याकडं आलं तर आमचा दुपट्टा तयार – बावनकुळे

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी काँग्रेसमधील काही नेते पक्षातून बाहेर पडणार असे वक्तव्य केले होते. काँग्रेसचं घर फुटणार हे मी वारंवार सांगतोय असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल प्रतिक्रया दिली होती. पक्षप्रवेशासाठी आम्ही कोणाच्याही घरी जाणार नाही. कुठलाही गट आणण्यासाठी आम्ही कुठेही जाणार नाही. परंतु, कुणी जर आमच्याकडं आलं तर आमचा दुपट्टा तयार आहे, असे बावनकुळे म्हणाले होते.

Tags

follow us