Download App

‘दोन तास ईडी-सीबीआय ताब्यात द्या, आम्ही सुद्धा’.. राऊतांचं भाजपला चॅलेंज!

Sanjay Raut on NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाचे निशाण फडकवत अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठा धक्का दिला. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. या घडामोडींवर पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला.

भाजपला विविध पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा मिळतोय याला काही भाजप नेते मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत. यावर राऊत म्हणाले, यांनी चक्क अंपायरच फोडला आहे. दोन तास ईडी आणि सीबीआय यांसारख्या यंत्रणा आमच्या हातात द्या. 2024 ला आम्ही सुद्धा मास्टरस्ट्रोक खेळू. मास्टरस्ट्रोकवर मास्टरस्ट्रोक मारू.

एका वर्षासाठी तात्पुरतं सत्तेत जाण्यात काय अर्थ? रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

ते पुढे म्हणाले, समान नागरी कायद्याचा मुद्दा भाजपने पुढे केला आहे. आता त्यांच्याकडे काहीच विषय राहिलेले नाहीत. मला असे वाटते की देशात प्रत्येकासाठी कायदा समान आणि एक असला पाहिजे. या कायद्याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची यासाठी कायद्याचा मसूदा आल्यानंतरच काय तो निर्णय घेता येईल. तसेच पक्षाची भूमिकाही ठरवता येईल, असे राऊत म्हणाले.

पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली आहे. या कठीण कळात जो प्रसंग शिवसेनेवर आला तो प्रसंग राष्ट्रवादीवर आला आहे. काँग्रेस पण तोडणार आहे. आम्ही आघाडी म्हणून एकत्र आहोत. तुम्ही आमचे खासदार नेले आमदार नेले कार्यालय दिली ही नौटंकी आहे.

जो प्रतिसाद उद्धव ठाकरेंना मिळतो तो शरद पवार यांना मिळतो. राहुल गांधी यांना सुद्धा मिळत आहे. आम्ही एकत्र येऊन चमत्कार करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपाचे राजकारण हे हुकूमशाहीकडे नेणारे आहे हे सगळ्यांना मान्य आहे. सगळे भ्रष्टाचारी लोक भाजपकडे गेले आहेत. शिवसेनेतील फूट घटनाबाह्य होती, असे राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोरच दोन्ही पवारांचे समर्थक भिडले…

Tags

follow us