Download App

तुमच्या पक्षात सगळेच संत महात्मे आहेत का ? ; संजय राऊतांचा भाजपला सवाल

मुंबई : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक केल्याच्या प्रकरणाने देशातील राजकारण तापले आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरत घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक होणार हे खुद्द अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि सिसोदिया स्वतः सांगत होते. अशा कारस्थानांचा सुगावा आता विरोधकांनीही लागतो. मी सुद्धा सांगत होतो की मला अटक होणार आहे. सध्याचे देशातील वातावरण आणीबाणीपेक्षाही भयंकर होत आहे.’ तुमच्या पक्षात सगळेच संत-महात्मे भरले आहेत का, असा सवाल त्यांनी भाजपला केला.

‘जे लोक सरकारला प्रश्न विचारतात सरकारविरोधात आवाज उठवतात. त्यांना कोणत्या तरी प्रकरणात गुंतवायचे. अटक करायची. त्यांना जामीन मिळू द्यायचा नाही. त्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करायचा, असे प्रकार बेफामपणे सुरू आहेत.’

वाचा : भाजप आणि ओवैसीच खरे राम आणि श्याम; राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार

ते पुढे म्हणाले, की ‘एखाद्या मंत्र्याला अटक करण्याचा निर्णय हा वैयक्तिक नसतो. तर असा निर्णय कॅबिनेटचा असतो. कालच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल उद्धव ठाकरे यांना भेटून गेले. त्यानंतर हा प्रकार घडला. खोटे आरोप करायचे प्रकार सुरू आहेत. देशातील लोकशाही रोजच खड्ड्यात जाताना दिसत आहे, हे दुर्दैव आहे,’ असे राऊत म्हणाले.

उद्धव ठाकरे-केजरीवाल भेट होताच आपला धक्का : मनीष सिसोदिया यांना अटक

विरोधकांवरील कारवायांवरून राऊत म्हणाले, की फक्त विरोधकांनाच टार्गेट केले जात आहेत. तुमच्या पक्षात सगळेच संत महात्मे आहेत का. तुमच्या लोकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. मंत्रालयाच्या बाहेरचे झाड हलवले तर भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडतील अशी परिस्थिती आहे. आयएनएस विक्रांत घोटाळा झाला. आयएनएसच्या नावावर तर पैसे गोळा केला जात होते. या प्रकरणातही चौकशी का होऊ देत नाही.क्लिनचीट का दिली गेली, असे सवाल त्यांनी सरकारला केले. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना टार्गेट करण्याचे जे प्रकार सुरू केले आहेत ते घातक आहेत. उद्या दुसरे सरकार आले तर तुम्हाला कोण वाचविणार, हा घातक पायंडा त्यांच्याकडून पाडला जात असल्याचे राऊत म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=Z_ekQZ4UOYQ

Tags

follow us